● महिला आणि मुलांसह 13 जणांचा मृत्यू
मुंबई : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील तिल्हार परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. येथे ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावर जाताना रेलिंग तुटून उलटली. या अपघातात महिला आणि मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. ट्रॉलीमध्ये सुमारे 42 लोक होते. 13 killed in early morning bus accident in Maharashtra Chief Minister Prime Minister announced help Pune Mumbai Highway तसेच महाराष्ट्रात आज पहाटे झालेल्या बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी आहेत.
रायगड – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पनवेलच्या कळंबोली येथील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. यावेळी मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. शिंदेंनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे यांनी अनुक्रमे 2 आणि 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकार होते.
पुण्यातील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांज पथकाच्या बसचा शनिवारी पहाटे ( १५ एप्रिल ) खोपोली येथील बोरघाटात भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला असणारे रेलिंग तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ही झांज पथकातील मुले होती. रुग्णालयात दोन जखमी मुलांशी संवाद साधला. यातील एकाने म्हटलं, ‘बस वेगाने चालवली जात होती. वाहन चालकाला हळू चालवण्याबाबत हटकलं देखील होतं. तरीही त्याने ऐकलं नाही’,” अशी आपबीती मुलाने सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Maharashtra CM Eknath Shinde reached Raigad's Khopoli area where 13 people died and 29 were injured in a bus accident. pic.twitter.com/om8KYDBeCR
— ANI (@ANI) April 15, 2023
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. आता मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचारासाठी 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. या घटनेवर मोदींनी दुःख व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली आहे. दरम्यान, शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली.
या बसमध्ये एकून 42 प्रवासी होते. पुण्याहून मुंबईला जात होते. त्या दरम्यान बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. यात तरुण वयातील प्रवाशांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारा ही दुर्घटना घडली. मुंबई गोरेगाव येथील बाजीप्रभु झांज पथक पुणे येथे गेली. परत रात्री एकच्या सुमारास हे पथक पुन्हा मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले. यावेळी बोरघाटात त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका अवघड वळणावर ही बस सुमारे तीनशे फुट खोल दरीत कोसळली. त्यात बसचा चक्काचूर झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, यशवंती हायकर्स मदतीसाठी दाखल झाले होते.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे : 1) जुई दिपक सावंत, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई 2) यश सुभाष यादव
3) कुमार. विर कमलेश मांडवकर, वय 6 वर्ष 4) कुमारी.वैभवी साबळे, वय 15 वर्ष 5) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय 16वर्ष 6) सतिश श्रीधर धुमाळ, वय 25 वर्ष 7) मनीष राठोड, वय 25 वर्ष, 8) कृतिक लोहित, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई 9) राहुल गोठण, वय 17 वर्ष, गोरेगाव मुंबई. 10) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई. 11) अभय विजय साबळे, वय 20 वर्ष,मालाड,मुंबई. 12) एक मयत ओळख पटलेली नाही.
》 आमदार गोरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अशातच इफ्तार पार्टीसाठी जात असताना भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा साताऱ्याच्या गोंदवले बुद्रुक चौकात अपघात झाला आहे. गोरे हे पुढील वाहनात होते. तर त्यांच्या पाठीमागे एक वाहन होते. ज्यात भाजपचे कार्यकर्ते होते. गाडी चौकात आल्यानंतर एका ट्रॅव्हल बसने गाडीला धडक दिली. यामध्ये सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही.