● केंद्राकडून राज्यात ‘सहकार विकास समित्यां’ची स्थापना
सोलापूर – केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी संस्था सक्षम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार विकास समित्यांची स्थापना केली आहे. Union Co-operative Minister’s strong footing in state co-operative sector; Amit Shah will double the number of ‘PAX’
या समित्यांवर प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे या समित्यांच्या माध्यमातून भाजप आता सहकार क्षेत्रात मजबूत पकड निर्माण करीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना (पॅक्स) सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार ज्या गावात सहकारी संस्था अस्तित्वात नाहीत, तेथे नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था किंवा दुग्ध, मत्स्यव्यवसाय संस्था स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये राज्य आणि जिल्हास्तरावर जिल्हा सहकार विकास समित्या स्थापन केल्या आहेत.
केंद्राच्या निर्णयानुसार देशात पुढील पाच वर्षांत दोन लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करणे, त्रिस्तरीय रचनेनुसार प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा जिल्हा आणि राज्य बँक यांच्याशी समन्वय राखून संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : www.surajyadigital.com
केंद्राच्या या निर्णयामुळे भाजप राज्यातील सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहकार विकास समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यपदी राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच इतर सदस्यांमध्ये सहकार व पणन, कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त किंवा प्रधान सचिव, तसेच सहकार आयुक्त, नाबार्ड, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, मत्स्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी असणार आहेत.
● अमित शाह आज मुंबईत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (शनिवारी) सायंकाळी मुंबईत येत आहेत. आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकही होईल. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचे शनिवारी मुंबईत आगमन होतंय, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत, असे ते म्हणाले. दरम्यान, शाह यांचा दोन दिवसीय दौरा आहे.