मुंबई : मराठवाडा व विदर्भात पुढील 5 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात 26 व 27 एप्रिलला अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील तापमानातही किमान 4 अंश सेल्सिअसने घट होणार आहे. उष्णतेची लाट येणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. Chance of hail with unseasonal rain for five days in the state, loss of farmers in Maharashtra
राज्यात विदर्भात सोमवार, २४ एप्रिलपासून पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार, २८ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मराठवाड्यात गुरुवार (दि.२७) व शुक्रवारी (दि.२८) गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी ५ दिवस राज्यात किमान तापमान ४ अंशाने, तर कमाल तापमान २ अंशाने सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
आता पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील पुढील पाच दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता नागपूरसह विदर्भात वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने फळबागायतदार पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.
दरम्यान सध्या नागपुरमध्ये ढगाळ वातावरण असून नागपूरचं तापमान ६ अंशाने कमी झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात देखील पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Intense rain over Maharashtra good rain receiving over These areas and one significant activity over Ajmer Kishanganj receiving good rain over These areas also pic.twitter.com/LzpF9TjAfn
— N𝙖𝙩i𝙤nal C𝙖pi𝙩al 𝙍egion 𝙒eather𝙈an (@NCR_WMN) April 15, 2023
राज्यात आगामी 5 दिवस राज्यात किमान तापमान 4 अंशाने, तर कमाल तापमान 2 अंशाने सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. दरम्यान, रविवारी छत्रपती संभाजीनगरात दुपारी ढगाळ वातावरण होते. पाराही 36.2 अंश सेल्सियसवर उतरला होता. जळगावला रविवारी सर्वाधिक 39 अंश तापमान नोंदवले गेले. विदर्भात सोमवार, 24 एप्रिलपासून पुढील 5 दिवस म्हणजे शुक्रवार, 28 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
हवामानातील चढ-उतार व बदलामुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम व त्रास होतोय. तसेच प्रामुख्याने याचा शेती पिकांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याचे नुकसान फळबाग तसेच शेती पिकांवर होणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विदर्भात जोरदार वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस, गारपिटीने राज्याच्या विविध भागात तडाखा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यातील नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झालेले नसतानाच आता पुन्हा अवकाळीचे संकट बळीराजाच्या डोकीवर बसले आहे.
पुढच्या चोविस तासांत राज्यात अवकाळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील पुर्व भागात उष्णतेची लाट तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात वादळी वाऱ्याचा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मराठवाड्यातील धारशिव, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशांपार गेला असुन उष्णतेची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडुन केले गेले आहे.