मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शाह यांनी आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी तब्बल पाऊण तास त्यांच्याशी चर्चा केली आहे. ही चर्चा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर झाल्याचे सांगितले जात आहे. Amitbhai’s visits increased… Amit Shah’s discussion with Eknath Shinde, Devendra Fadnavis for half an hour Maharashtra election
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. ते दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. महिन्याभरातील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. विलेपार्लेतील ‘मन की बात’ कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार असून याच कार्यक्रमाला अमित शाह हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 100 वा ‘मन की बात’ कार्यक्रम आहे. कार्यक्रमानंतर ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. अमित शहा आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत जवळपास पाऊण तास चर्चा केल्याची माहीती आहे. आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी ही चर्चा झाल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. याचा वृत्तात काही वृत्तवाहिन्यांवर दाखवला जात आहे.
चर्चेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. यावेळी अमित शाह आणि त्यांच्यामध्ये आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ‘मन कि बात…देशाशी जोडले जाण्याचा प्लॅटफॉर्म मिळाला, मी खूप भावूक झालो – नरेंद्र मोदी
मुंबई : ‘मन कि बात’ कार्यक्रमाचा प्रत्येक एपिसोड विशेष होता. मन कि बात कार्यक्रमामुळे देशाशी जोडले जाण्याचा एक प्लॅटफॉर्म मला मिळाला, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. PM मोदींनी ट्विट करुन मन कि बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण ऐकणाऱ्या भारतीयांचे व जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. मन कि बात ऐकतानाचे फोटो NaMo App वर अपलोड करा, असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 व्या भागासाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुमची आलेली लाखो पत्रे वाचून मी खूप भावूक झालो. त्यावेळी आकाशवाणीचे सहकारीही स्तब्ध झाले होते. मन की बात हा माझ्यासाठी सण झाला आहे. मन की बात आता माझ्यासाठी आस्थेचा विषय झाला आहे. या कार्यक्रमामुळे मी सर्वसामान्यांशी जोडलो आहे,’ असे ते म्हणाले. त्यांनी ‘सेल्फी विद डॉटर’ या अभियानाचाही कार्यक्रमात उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा मन कि बात हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विलेपार्ले येथे ऐकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन कि बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे तिन्ही नेते एकत्रितपणे ऐकत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यावेळी उपस्थित आहेत. गृहमंत्री शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे फोटो समोर आले आहेत.
मन की बातचा हा भाग देशभरातील आकाशवाहिनीवरून सकाळी 11 वाजता प्रक्षेपित झाला आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात माझ्यासाठी पूजा आणि व्रत असल्याचे म्हटले आहे. मन की बातचा शंभरावा भाग असल्याने दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये विजया दशमीच्या दिवशी सुरू झालेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम जनतेसाठी सकारात्मकतेचा अनोखा उत्सव झाला आहे .या कार्यक्रमाची प्रत्येकजण दर महिन्याला वाट पाहत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
आपण सर्वांनी मिळून 3 ऑक्टोबर 2014 रोजी, विजया दशमी सणाच्या दिवशी, ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजया दशमी हा दुष्ट शक्तीवर चांगल्या शक्तीने विजय मिळविण्याचा उत्सव आहे. मन की बात कार्यक्रम म्हणजे आपण सकारात्मकता साजरी करतो. लोकांकडून हजारो पत्रे आणि संदेश मिळाल्यानंतर भावनिक होत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.
मन की बात हा कार्यक्रम 22 भारतीय भाषा आणि 29 बोलीमध्ये प्रक्षेपित केला जातो. त्या व्यतिरिक्त, फ्रेंच, चीनी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो. लाल किल्ल्यावर देशाच्या अनेक भागांतून आलेल्या लोकांनी सेल्फी पॉईंट्समध्ये थांबून आपले मनोगत व्यक्त केले.
आतापर्यंत ९९ भागांच्या रेकॉर्डिंगसाठी पाच ऑडिओ बूथ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी लोक त्यांचा आवडता एपिसोड ऐकू शकतात. यासोबतच आपले मतदेखील व्यक्त करू शकतात. हर्षित जैन म्हणाले, की येथे येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षक देशराज यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये सांगितलेल्या युक्तीमुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
○ ‘आधी ‘मन की बात’ मग लग्न’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडियो वरिल कार्यक्रमाचा आज 100 वा एपिसोड पार पडला. बुलढाण्यात सार्वजनिक ठिकाणी या टिव्ही स्क्रिनवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक नवरदेव तेथे आला आणि आधी मन की बात मग लग्न असे सांगत मोदीजींचे पुर्ण मनोगत ऐकले. हळदीच्या अंगाने आलेल्या या नवरदेवाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. तसेच परिसरात तो चर्चेचा विषय ठरत आहे.