बार्शी : न्यायालयातील फसवणुकीचा खटला मागे नाही घेतला तर कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देवून ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. Extortion demanded to withdraw court case, threat to defame family, case registered against five people in Barshit
न्यायालयातील ३६ लाख रुपयांचा फसवणुकीचा फौजदारी खटला मागे घे म्हणून धमकी देवून बदनामीकारक पोस्टर शहरात वाटून बदनामी टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. योगेश वसंत लोखंडे, जुगलकिशोर बन्सिलाल तिवाडी, सतिश सुरेश जाधव, विजय बाळकृष्ण साळुंखे, निखिल दत्तात्रय मस्के, ( सर्व रा. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने न्यायालयात यातील संशयित आरोपी योगेश लोखंडे व सतीश जाधव यांचे विरुद्ध फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो खटला मागे नाही घेतला तर तुझ्या कुटुंबाची बदनामी करीन अशी धमकी दि.२६ एप्रिल रोजी सकाळी योगेश लोखंडे , जुगलकिशोर तिवाडी ,सतिश जाधव यांनी चारचाकी गाडी घेऊन फिर्यादीचे घरी येऊन दिली. तसेच खटला मागे न घेतल्यास बदनामीकारक पोस्टर वाटप करुन तुझ्या कुटुंबाची व तुझ्या नवऱ्याची बदनामी करीन असे धमकावले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दि २६ रोजी संशयितांनी शहरातील बस स्टैंड परिसरात पोस्टर वाटले, फिर्यादीचे पती यांना फोनद्वारे कळवले. पतीने बदनामी होत आहे बोलवून घेऊन मिटवून टाक., मनस्ताप नको म्हणून पत्नीस फोन केला. ती बदनामी टाळण्यासाठी फिर्यादीने लोखंडे, तिवाडी, जाधव यांना बोलावून घेतले. या तिघांनी फिर्यादीस तुझ्या कुटूंबाची बदनामी करणारे फोटो बसस्टँड परिसरात वाटणे सुरू आहे. रोख ५० हजार रुपये आताच दे तरच मी थांबवतो असे धमकावले.
पैसे रोख नाहीत खात्यावर पाठवू का असे म्हणाल्यावर तिवाडी व जाधव याने योगेशच्या खात्यावर आता फक्त ५ हजार पाठव, त्याचे खाते आहे. तसेच उरलेले ४५ हजार रुपये उद्या सकाळी ११ वाजेच्या आत रोख दे असे पैसे खात्यावर ऑनलाइन घेता येत नाहीत, असे सांगून कागदावर लोखंडे याचा खाते क्रमांक देवून त्यावर पैसे पाठवायला सांगितले.
संशयितांनी धमकावल्यामुळे आणि बदनामी थांबवण्यासाठी फिर्यादीने लोखंडेच्या खात्यावर ५ हजार रुपये पाठवले आहेत. उरलेले ४५ हजार रुपये रोख स्वरूपात सकाळी ११ वाजायच्या आत दे, नाहीतर पुन्हा बदनामी करणारे पोस्टर बस स्टैंड परिसरात वितरण करू आणि मुतारीवर चिकटवून बदनामी करू असे फिर्यादीस धमकावले.
दि २७ रोजी लोखंडे, तिवाडी व जाधव यांनी सकाळी फिर्यादी व तिचे पतीचे फोनवर उरलेली रक्कम मागणीसाठी फोन केले. नंतर तिवाडी यांच्या मोबाईल नंबर वरून फिर्यादीचा मोबाईल नंबर वर एसएमएस आला. त्यामध्ये अकरा वाजले. टाइम संपला. काल फक्त ५ दिले आहेत. मला नाटक नको आहे. अजून ४५ पाहिजेत. नाहीतर पोस्टर बार्शी, सगळीकडे वाटप सुरु होइल दहा मिनीटात फक्त वाटप नाही चिकटावयला सुरु करणार आहेत. तुम्ही दोघे नवरा बायको फोन उचलत नाहीत. आता तुम्ही फोन करा आम्ही उचलणार नाहीत विजय साळुंखे आणि निखिल मस्के यांनी आम्हाला पोस्टर वाटायला पैसे दिले आहेत. आता बसा रडत असा उल्लेख आहे. त्यामुळे या संगनमताने केलेल्या कटकारस्थानामध्ये विजय साळुंखे, व निखिल मस्के हे ही सहभागी आहेत अशा आशयाची तक्रार दिली आहे. त्यावरून संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.