अक्कलकोट : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दुधनी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठनेते माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा अभेद्य गड. त्यांनीच स्थापन केलेल्या बाजार समितीवर स्थापनेपासून त्यांचीच सत्ता. Akkalkot, Siddramappa Patil Sachin Kalyanshetty’s flag on Dudhani Bazar Committee, fall in Siddharam Mhetre’s fort याच सत्तेसाठी झालेल्या निवडणुकीत म्हेत्रेंची त्यांच्याच बालेकिल्ल्यात पडझड झाली असून भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. अक्कलकोट बाजार समितीमध्ये भाजपचे माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांचीच सत्ता होती. ती कायम ठेवत कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटला दुधनीचीही जोड देत स्वतःची विजयी घोडदौड कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाचे अक्कलकोट व दुधनी बाजार समितीतवर एकहाती सत्ता आली आहे. या निकालामुळे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का. दुधनी मार्केट कमिटीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाचा ऐतिहासिक विजय.
कल्याणशेट्टी व पाटील यांचे एकहाती सत्ता प्रस्थापित झाल्याने तालुक्यात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे गटाला मोठा धक्का बसला आहे. दोघांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनल आणि दुधनी येथे श्री सिद्धारामेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलने अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिध्द केला आहे.
अक्कलकोट मार्केट कमिटीत विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा गटाचे 18 पैकी 12 जागा तर दुधनी मार्केट कमिटीत 18 पैकी 12 जागेवर यश संपादन करीत अक्कलकोट व दुधनी या दोन्ही बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. इकडे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांना अक्कलकोट आणि दुधनी मार्केट कमिटी निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हा निकाल विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाला मोठा दिलासा देणारा निकाल ठरला आहे. अक्कलकोट व दुधनी मार्केट कमिटी निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून अतिशय चुरशीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आला होता. दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात होता. अक्कलकोट मार्केट कमिटीत एकूण 18 संचालक जागेवर 42 उमेदवार निवडणूक रिंगणात तर दुधनी बाजार समितीत 18 जागापैकी दोन जागा बिनविरोध तर उर्वरित 16 जागेवर 32 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.
अतिशय चुरशीने झालेल्या या मतदान प्रक्रियेत अखेर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाचे उमेदवार घवघवीत यश संपादन केले. या आजी-माजी आमदार मधील लढत अतिशय रंगतदार ठरल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागली होती. अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या मतमोजणीला रविवारी सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे गटाला अक्कलकोट मार्केट कमिटीत 6 जागा तर दुधनी बाजार समितीत 6 जागेवर समाधान मानावे लागले.
○ यश अपयश पिता-पुत्रांचा
दुधनी बाजार समितीत पंधरा वर्षांनंतर सत्तांतर झाले.
दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे तर माजी सभापती शंकर म्हेत्रे या पिता-पुत्रांचा मार्केट कमिटी निवडणुकीत दारुण पराभव तर अक्कलकोट मार्केट कमिटी निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व संजीवकुमार पाटील या पिता-पुत्रांचा विजय झाल्याने तालुक्यातील या पिता पुत्रांच्या यश-अपयश मुळे सर्वांनाच अश्चर्यचा धक्का बसला आहे.
○ दुधनी मार्केट कमिटीवर ऐतिहासिक विजय
दुधनी बाजार समिती स्थापन झाल्यापासून माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची एकहाती सत्तेला अखेर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी गनिमी काव्याने धक्का देत दुधनी बाजार समितीवर ऐतिहासिक विजय संपादन केले.
● अक्कलकोट मार्केट कमिटीतील सर्वसाधारण गटातून विजयी उमेदवार
करपे बाबुराव -353
अप्पासाहेब पाटील -354
संजीव पाटील–378
सिद्रामप्पा पाटील-376
बाके कामगोंडा -348
बिराजदार धनराज-340
मल्लिकार्जून पाटील-357 -कपबशी
महिला राखीव
——-
बिराजदार शिवमंगल धोंडप्पा-370
पार्वतीबाई स्वामी–353
इतर मागासवर्गीय
—
प्रकाश कुंभार-377
बंदीछोडे राजेंद्र –377
अडत व्यापारी
—–
श्रीशैल घिवारे-84
माशाळे बसवराज-84
हमाल,तोलार
–‐-
यल्ल्प्पा ग्वल्ल-59
ग्रामपंचायत मतदार संघ
——-
कार्तिक पाटील-445
शिवयोगी लाळसंगी-415
सिध्दार्थ गायकवाड-461
प्रकाश बिराजदार-466
○ दुधनी मार्केट कमिटीतील सर्वसाधारण विजयी उमेदवार.
—–
बिराजदार देवेंद्र-205
सिध्दाराम बाके-204
विश्वनाथ नागुर-202
विश्वनाथ कोगनुर-201
मल्लिकार्जून झळकी-201
मोतीराम राठोड-201
परमशेट्टी सातलिंगप्पा-200
महिला राखीव
——
सुवर्णा मचाले-203
अश्विनी सालेगाव-203
इतर मागासवर्गीय
—-
शेख वहिदबाशा-201
भटक्या विमुक्त जाती
—–
पुजारी निंगण्णा-208
ग्रामपंचायत मतदार संघ
——-
सिध्दाराम तोळणुरे-171
रमेश पाटील-170
आर्थिक दुर्बल घटक
——
पाटील शिवानंद बाबुराव-121
अनुसुचित जमाती
——–
धसाडे इरण्णा-123
हमाल तोलार
——
बाबु कोळी-145
बिनविरोध
——–
सातलिंगप्पा परमशेट्टी
चंद्रकांत येगदी
अक्कलकोट मार्केट कमिटी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अमर झालटे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिध्देश्वर कुंभार तर दुधनी बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश नालवार यांनी काम पाहिले.
अक्कलकोट व दुधनी मार्केट कमिटी निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ राजेंद्रसिंह गौर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी तर दक्षिण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
“भाजपाच्या फडणवीस शिंदे सरकारवर मोठा विश्वास दाखवत मतदारांनी अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान केले. भाजपाला जनतेचा आर्शिवाद मिळाला. दुधनीत हुकूमशाहीला धक्का देत १५ वर्षानंतर सत्तांतर झाले”
– सचिन कल्याणशेट्टी , आमदार
” आम्ही बिगर पैशाची निवडणूक जिंकलो. विरोधकांनी पैसे खर्च करूनही शेतकरी व्यापारी , आमच्या सोबत आहेत. त्यांचे काम आयुष्यभर करू”
सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार