सोलापूर – न्यायालयातील वॉरंटच्या भीतीने एका विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुना विडी घरकुल येथे शनिवारी (ता. 29) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. Fear of court warrant, married youth commits suicide by hanging, Govt hospital well digging stone in head
गौस हबीबरहमान शेख (वय ३५ रा.जुना विडी घरकुल, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सध्या माहेरी असून कौटुंबिक न्यायालयात त्यांचा वाद चालू आहे. या खटल्या संदर्भात वॉरंट निघण्याच्या भीतीने त्याने शनिवारी रात्री राहत्या घरात खुर्चीवर उभारून दरवाजाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हबीबरहमान (वडील) यांनी त्याला नातेवाईकांच्या मदतीने फासातून सोडवून बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वी मयत झाला.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
○ जेऊर येथे विहिरीचे खोदकाम करताना डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार
सोलापूर – विहिरीचे खोदकाम करीत असताना ५० फुट उंचीवरून दगड डोक्यात पडल्याने ४१ वर्षीय मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही दुर्घटना जेऊर (ता.अक्कलकोट) येथे शनिवारी (ता.29) सकाळच्या सुमारास घडली.
सुभाष सोमलिंग राठोड (वय ४१ रा. गोपाळतांडा, जेऊर ता. अक्कलकोट ) असे मयताचे नाव आहे. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी उंचावरून मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटल येथे दाखलकेले असता ते रविवारी सकाळी मयत झाले.
मयत सुभाष राठोड यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. शासकीय रुग्णालयात शैवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेचे प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अत्याचारित मूकबधिर महिलेच्या गर्भपातास उच्च न्यायालयाची परवानगी
सोलापूर : अत्यावस्थेत सापडलेल्या ३५ वर्षीय अनोळखी मूकबधिर महिलेच्या गर्भपातास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. लवकरच गर्भपात होणार आहे. संबंधित पीडित महिला अनोळखी असून ती रस्त्यावर कुठेही फिरते.
पीडित महिलेवर दुष्कर्म करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सदर बझार पोलिसांनी स्वतःहून फिर्याद नोंदवून घेतली. पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती मूकबधिर आहे आणि प्रकृती सक्षम नाही. त्यातच सहा महिन्यांची गर्भवती आहे. बाळ सांभाळण्यास ती सक्षम नाही.
उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले की, २४ आठवड्यांचा गर्भ आहे. वैद्यकीय तपासणी करून प्रक्रिया पार पाडावी.
महिलेच्या गर्भपातासाठी सदर बझार पोलिस आणि सेवाभावी संस्था सखी वन स्टॉप सेंटर या संस्थेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. उच्च न्यायालय विधी सेवा पॅनलकडे प्रस्ताव आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाली. तो प्रस्ताव बुधवारी मंजूर झाला. पीडित महिलेचा गर्भपात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी गर्भपात होईल.
अर्भक जिवंत असल्यास योग्य ती काळजी घेऊन उपचार करावेत. पीडिता मूल स्वीकारण्यास तयार नसल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दत्तक देण्याबाबत प्रशासकीय संस्थेने योग्य ती पाऊले उचलावीत.
या प्रकरणात सचिव नरेंद्र जोशी, उच्च न्यायालय विधी सेवा समिती पॅनल अॅड अजिंक्य उदाने, सोलापूर विधी सेवा प्राधिकरण सहायक लोक अभिरक्षक अॅड. देवयानी किणगी, अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, लिपिक विजय माळवदकर यांची मदत मिळाली.