पंढरपूर । सुरज सरवदे
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिचारक गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी साखर पेरणी केल्याचे बोलले जात आहे. Market Committee Election: Prashant Parichara said, if there is support, I will definitely play Gulal in 2024, Pandharpur MLA
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपला झेंडा कायम राखला असून विरोधी अभिजीत पाटील गटाचा मोठा मताधिक्याने पराभव केला. परिचारक गटाने तीस वर्षा पासून असलेली बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. परिचारक गटाने तीस वर्षा पासून असलेली बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. सत्ताधारी गटाचे सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताने विजयी झाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले होते की, तुमची साथ असेल तर नक्की 2024 ला गुलाल खेळू ! या त्यांच्या प्रतिक्रिया वरून माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडून गेली आहे.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी प्रशांत परिचारक यांनी तीन सभा घेतल्या. सभांना मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. काही कार्यकर्त्यांनी विधानसभा लढवण्याची मागणी देखील थेट सभेमधून केली होती. त्यावेळी देखील ‘समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ मिलता नही, असे म्हणत भगवद्गीतेप्रमाणे काम करत राहणार, असे म्हणत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेला वाव निर्माण करणारे वक्तव्य केले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिजीत पाटील गट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे परिचारक गटाला आलेली मरगळ प्रशांत परिचारक यांनी मोठ मोठ्या सभा घेऊन मरगळ बाजूला सारली. विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सजग राहावे, यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सभा मधून केले.
प्रशांत परिचारक यांनी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या माध्यमातून ते विधान परिषदेवर गेले होते. मात्र, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांना करता आले नाही. 2014 साली विधानसभेला त्यांचा पराभव झाला होता. तर 2019 साली सुधाकरपंत परिचारक उभारले होते. 2021 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती. ते विजयी झाले होते. त्यामुळे परिचारक यांचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आमदार होण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकले नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अंगाला गुलाल लागला आहे. तोच गुलाल 2024 पर्यंत राहणार का, याकडे जाता सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.