● कोरवली येथील म. बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांनी केला अंत्यसंस्कार
विरवडे बु – मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील उजनी कॅनॉल मध्ये शुक्रवारी ( दि. २८ एप्रिल ) सकाळी सुमारे ११ च्या दरम्यान पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आले. Mohol Destitute body found in Ujani canal in Parameshwar Pimpri Social organization Funeral Solapur
कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना ही माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह काढून ते कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवले. अंदाजे ३५ ते ४० वय वर्षाच्या या बेवारस मृतदेहच्या अंगात करड्या रंगाची अंडरवियर असून शरीर बांधा अत्यंत मजबूत आहे.
कोरीलेली काळी दाढी, डोकेस काळे कमी केस, हातामध्ये लाल रंगाचा दोऱ्याचा गोफ अशा वर्णनाचा मृतदेह आहे. कोणीही ओळख पटवून ते बेवारस मृतदेह घेऊन गेले नसल्याने, कामती पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जीवराज कासविद यांनी कोरवली येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे दि. २९ रोजी त्या बेवारस मृतदेहाचे शव विच्छेदन करून कामती येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार जीवराज कासविद, कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे, संजय कस्तुरे, अमोगसिद्ध सुतार, बाळासाहेब नंदुरे, काशिनाथ म्हमाणे, जेसीबी चालक अभिजित सावंत, विठ्ठल ओहोळ, नागेश गायकवाड आदींसह सामाजिक समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विहिरीचे खोदकाम करताना डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार, अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील घटना
सोलापूर : विहिरीचे खोदकाम करत असताना ५० ते ५५ फुटावरून मोठा दगड डोक्यात पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी शिवारात घडली. सुभाष सोमलिंग राठोड ( वय ४१, रा. जेऊर गोपाळ तांडा, ता अक्कलकोट ) असे त्या मयत मजुराचे नाव आहे.
विहिरीचे खोदकाम करीत असताना ५० फुट उंचीवरून दगड डोक्यात पडल्याने ४१ वर्षीय मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही दुर्घटना जेऊर (ता.अक्कलकोट) येथे शनिवारी (ता.29) सकाळच्या सुमारास घडली.
काल रविवारी (ता. ३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास ते जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी उंचावरून मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटल येथे दाखल केले असता ते रविवारी सकाळी मयत झाले.
मयत सुभाष राठोड यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेचे प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.