मोहोळ : वेळेत माहिती न दिल्याने मोहोळचे निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व त्यांचे संबंधित कर्मचारी सौ सुरवसे यांना प्रत्येकी ५०० रु दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मोहोळचे तहसिलदार प्रशांत बेंडसे यांनी दिला आहे. 500 rupees fine to Naib Tehsildar of Mohol information in time
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते गणेश नागनाथ शिरसट यांनी माहिती अधिकारात शिधा पत्रिकेचे नोंद रजिस्टरचे एक जानेवारी २०१५ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीच्या नकला मागितल्या होत्या. मात्र जनमाहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार भालचंद्र यादव व शासकीय माहिती अधिकारी पुरवठा संकलन कर्मचारी वनीता सुरवसे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे आपिलकर्ते गणेश शिरसट यांनी आपिलिय अधिकारी प्रशांत बेंडसे यांच्याकडे अपील केले. दिनांक २९ मार्च रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान आपिलकर्ते गणेश शिरसट आणि सामनेवाले निवासी नायब तहसीलदार बी टी यादव व वनिता सुरवशे हजर होते, असे आदेशात म्हटले आहे. तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी आपील मान्य केले आणि संबंधित बी टी यादव व सौ वनिता सुरवसे यांनी वेळेमध्ये माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे त्या दोघांनाही प्रत्येक ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
अर्जदारास मागितलेली माहिती विनामुल्य देण्यात यावी, त्याचबरोबर अपीलकर्ता यांना सदरचा आदेश मान्य नसल्यास ९० दिवसापर्यंत राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांचेकडे आपील दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निकालामुळे मोहोळ तहसील कचेरीतील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मोहोळ । परमेश्वर पिंपरीत उजनी कॅनॉलमध्ये आढळला बेवारस मृतदेह
● कोरवली येथील म. बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांनी केला अंत्यसंस्कार
विरवडे बु – मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील उजनी कॅनॉल मध्ये शुक्रवारी ( दि. २८ एप्रिल ) सकाळी सुमारे ११ च्या दरम्यान पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आले.
कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना ही माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह काढून ते कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवले. अंदाजे ३५ ते ४० वय वर्षाच्या या बेवारस मृतदेहच्या अंगात करड्या रंगाची अंडरवियर असून शरीर बांधा अत्यंत मजबूत आहे.
कोरीलेली काळी दाढी, डोकेस काळे कमी केस, हातामध्ये लाल रंगाचा दोऱ्याचा गोफ अशा वर्णनाचा मृतदेह आहे. कोणीही ओळख पटवून ते बेवारस मृतदेह घेऊन गेले नसल्याने, कामती पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जीवराज कासविद यांनी कोरवली येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे दि. २९ रोजी त्या बेवारस मृतदेहाचे शव विच्छेदन करून कामती येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार जीवराज कासविद, कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे, संजय कस्तुरे, अमोगसिद्ध सुतार, बाळासाहेब नंदुरे, काशिनाथ म्हमाणे, जेसीबी चालक अभिजित सावंत, विठ्ठल ओहोळ, नागेश गायकवाड आदींसह सामाजिक समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.