○ पुढचा अध्यक्ष कसा निवडावा, केले भाषणात सूचित
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना भावनिक होऊ नका, असे आवाहन केले आहे. शरद पवार अध्यक्षपदावर नसतील तरी ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार नाहीत, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. Ajit Pawar said, don’t get emotional, Sharad Pawar said,
I am with you on the Committee Chairman दरम्यान सक्रीय राजकारणातून मी निवृत्त होत आहे, अध्यक्षपद सोडत आहे, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले आहेत. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान यानंतर बोलताना शरद पवार यांनी आपण पदावरून बाजुला जात असलो, तरी मी नेहमी तुमच्यासोबत आहे, असे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केली. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे.” तसेच संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#WATCH | "I am resigning from the post of the national president of NCP," says NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/tTiO8aCAcK
— ANI (@ANI) May 2, 2023
आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तुमचा राजीनामा कुणालाही मंजूर नाही. तुम्ही घेतलेल निर्णय मागे घ्या. आजपर्यंत आम्ही सर्वांनी तुम्ही म्हणाल तसे काम केले आहे. आता तुम्ही वय, अमूक-तमूक असे काही सांगता ते काही आम्हाला मान्य नाही. या वयातही तुम्ही आमच्या दसपट काम करता. तुमची देशाला गरज आहे. देशातील कुणालाही तुमचा राजिनामा मान्य होणार नाही. त्यामुळे आपण आपला राजीनामा मागे घ्यावा. आम्ही तुम्ही म्हणाल तसे वागलेलो आहोत. तुम्ही आमच्या सुख-दुःखात राहिलेला आहात. असे असतानाही आम्ही तुम्हाला कसे काय बाजूला बसू देऊ शकतो. पक्षातील कमिटी वगैरे काही आम्हाला मान्य नाही. तुम्हीच आमची नेते, तुम्हीच आमची कमिटी .. तुम्हीच आमचे सर्वकाही.”
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आज ना उद्या ही वेळ येणार होती, असे अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांशिवाय पुढे जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. “आपल्या सर्वांच्या भावना साहेबांनी समजून घेतल्या. तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. पवारसाहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असे होणार नाही. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, पण सोनिया गांधीकडे पाहून पक्षाचे काम सुरू आहे. यापुढेही शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाचे काम सुरू राहणार आहे.
अजित पवारांनी यांनी शरद पवार यांच्या विचारानुसारच पक्षाचे काम होईल, असेही अश्वासन दिले. “पवार साहेबांच्या वयाचा विचार करता, साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करून आपण नवीन नेतृत्वाकडे आपण ही जाबाबदारी देणार आहे. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. शेवटी साहेब म्हणजे पक्ष हे सांगण्याची कुणाची गरज नाही. यानंतरही कुठेही आला तरी साहेब आपल्याला मदत करतील. साहेब अध्यक्ष असू वा नसू आतापर्यंत जसे सुरू होते तसेच यापुढेही काम सुरू राहील.”
शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “पवारसाहेबांनी भाकरी फिरवायची असते, असे वक्तव्य केले होते. आता तुम्ही म्हणता त्यांच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे. मी काकींशीही (शरद पवारांच्या पत्नी) बोललो आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की साहेब निर्णय मागे घेणार नाहीत. ते यावर ठाम आहेत. वयानुसार आज ना उद्या हा निर्णय घेण्याची वेळ येणारच होती. ते अध्यक्ष नसले तरी आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.”
○ पुढचा अध्यक्ष कोण ?
आता पुन्हा निवडणुकीत उभा राहणार नसल्याचं जाहीर करत राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुढील पक्षाचा नवीन अध्यक्ष ठरविण्याची स्थापन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी, असे शरद पवारांनी भाषणात सूचित केले.
शरद पवारांनी या समितीत काही नेत्यांची नावं सूचवली आहेत. हे नेते पक्षाच्या पुढील अध्यक्षबाबतचा निर्णय घेतील. पवारांनी या समितीसाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड या प्रमुख नेत्यांची नावं सुचवली आहेत. या नेत्यांसह त्यांनी इतरही काही सदस्यांची नावं सुचवली आहेत. त्यामध्ये फौजिया खान (अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस) आणि सोनिया दूहन, (अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस) यांचा समावेश आहे.
ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहणार , असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.