मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असे आज पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या ‘लोक माझे सांगाती’ या पवार यांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. Big shock to NCP leaders: Sharad Pawar announces retirement from politics Ajit Pawar Jayant Patil तसेच आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही, राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष आता पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला आहे. आजपर्यंतच्या कारकीर्दीत अनेक गौप्यस्फोट करणारे शरद पवार या पुस्तकातून काय गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय कारकीर्द कशी घडली याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. पवार म्हणाले, की जनतेने मला ५६ वर्षे राजकारणात ठेवले. पहिल्यांदा १९७२ मध्ये मला तिकीट मिळाले. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. गोवा मुक्ती संग्रामत पहिला संघर्ष केला. सार्वजनिक जीवनता शिकायला मिळाले.
माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#WATCH | "I am resigning from the post of the national president of NCP," says NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/tTiO8aCAcK
— ANI (@ANI) May 2, 2023
शरद पवार यांनी आज सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. मात्र हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पण आताच्या आता निर्णय घ्या, अशी विनंती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.
शरद पवार यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. मात्र यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील आज रडले. तसेच तुम्ही निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही राजीनामा देणार, तुम्ही आमचा सर्वांचा राजीनामा घ्यावा, असे म्हणत जयंत पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. तर जितेंद्र आव्हाडही यावेळी रडले. अनिल देशमुख यांनी पवारांना आम्हाला पोरके करु नका, असे म्हटले आहे.
शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडणार व यापुढे निवडणूकही लढवणार नाही, असे मुंबईतल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात म्हटले. मात्र या निर्णयाला सभागृहातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. हा निर्णय मागे घ्या, जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही हे सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
शरद पवार यांनी आज सक्रीय राजकारणातून निवृत्त घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. पवारांनी निवृत्ती मागे घ्यावी, अशी विनंती मुंबईतल्या सभागृहात उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे पवारांच्या पाया पडले आणि त्यांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.