मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटर समोर राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन केली. त्यानंतर यावर अजित पवार यांनी शरद पवारांचा निरोप घेऊन कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी ‘शरद पवारांनी 2 ते 3 दिवस विचार करण्यासाठी वेळ द्या. त्यानंतर मी माझा अंतिम निर्णय सांगतो,’ असे सांगितल्याचे अजित पवारांनी म्हटले. Sharad Pawar’s Final Decision In 3 Days, Sharad Pawar Farewell Ajit Pawar Says Politics
‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं. कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असंही पवारांनी सांगितलं आहे. दोन-तीन दिवसांमध्ये निवृत्तीबाबात शरद पवार निर्णय घेणार आहेत.
शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणं धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना भावनिक होऊ नका, असे आवाहन केले आहे. शरद पवार अध्यक्षपदावर नसतील तरी ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार नाहीत, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. दरम्यान सक्रीय राजकारणातून मी निवृत्त होत आहे, अध्यक्षपद सोडत आहे, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे.
सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता पवारांच्या आगामी भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#WATCH | "…we told him (Sharad Pawar) that workers are quite upset. We also told him that party workers want him to remain the party president along with having a working president. He said he will rethink his decision & requires 2-3 days…": NCP leader Ajit Pawar on Sharad… pic.twitter.com/8Fjb41QdDD
— ANI (@ANI) May 2, 2023
शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले आहेत. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान यानंतर बोलताना शरद पवार यांनी आपण पदावरून बाजुला जात असलो, तरी मी नेहमी तुमच्यासोबत आहे, असे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केली. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे.” तसेच संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले.
आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तुमचा राजीनामा कुणालाही मंजूर नाही. तुम्ही घेतलेल निर्णय मागे घ्या. आजपर्यंत आम्ही सर्वांनी तुम्ही म्हणाल तसे काम केले आहे. आता तुम्ही वय, अमूक-तमूक असे काही सांगता ते काही आम्हाला मान्य नाही. या वयातही तुम्ही आमच्या दसपट काम करता. तुमची देशाला गरज आहे. देशातील कुणालाही तुमचा राजिनामा मान्य होणार नाही. त्यामुळे आपण आपला राजीनामा मागे घ्यावा. आम्ही तुम्ही म्हणाल तसे वागलेलो आहोत. तुम्ही आमच्या सुख-दुःखात राहिलेला आहात. असे असतानाही आम्ही तुम्हाला कसे काय बाजूला बसू देऊ शकतो. पक्षातील कमिटी वगैरे काही आम्हाला मान्य नाही. तुम्हीच आमची नेते, तुम्हीच आमची कमिटी .. तुम्हीच आमचे सर्वकाही.”