सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. येत्या ५ रोजी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडीचे संकेत असून त्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्यातील डझनभर नेत्यांचं ‘वऱ्हाड’ सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहे. NCP’s ‘Wedding’ in Solapur on Sunday, will be attended by dozens of leaders from the state
सांगोला तालुक्यातील दोन राजकीय कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे हजेरी लावणार असून त्यातील एका कार्यक्रमात साखर सम्राट अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात आले. सांगोला येथील कार्यक्रम सायंकाळी माजी आटोपून सायंकाळी महापौर मनोहर सपाटे यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यासाठी शरद पवार हे हजेरी लावणार आहे.
यावेळी शरद पवार यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते साकडे घालणार आहेत. कालच शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे. ही बैठक तातडीने घेण्याऐवजी सायंकाळी उशिरा घेतल्याबद्दल शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यावर अनेकांनी तोंडसुख घेतले आहे. तर इकडे पवारांच्या या निर्णयावर बैठक घेण्याचे स्वारस्य जिल्हा राष्ट्रवादीच्या एकाचे नेत्याने न दाखविल्याने पवारांवर कुणाचे प्रेम किती यावरच राष्ट्रवादीत चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ सुप्रिया सुळे आघाडीवर…
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडीची घोषणा स्वतः शरद पवार हे ५ मे रोजी मुंबईतून करणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी बुधवारी मुंबईत अध्यक्ष निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. प्रफुल्ल पटेल आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या तीन नावावर चर्चा झाली. यातील प्रफुल्ल पटेल यांनी नकारघंटा वाजविली आहे. तर अजित पवार यांनाही या पदाबाबत स्वारस्थ नसल्याचे समजले. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
● विश्वासात न घेतल्याने नाराजीचा सूर
शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत घेतलेला निर्णय ह कौटुंबिक पातळीवर चर्चा करुन घेतल्याची माहिती बाहेर पडताच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बऱ्याच नेत्यानी मुंबईतील बैठकीत नाराजीचा सूर आवळला. हा शरद पवार यांचा कौटुंबिक मुद्दा नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे सर्वांना विश्वास का घेतले नाही, असा सूर या बैठकीत उमटल्याचे सांगण्यात आले.