सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून दोन मुलाचा जीव घेऊन स्वतःही आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने सोलापूर हादरले आहे. आज न्यायालयाने मृत आईवर गुन्हा दाखल केला असून मृत मुलाच्या बापास म्हणजेच त्रास देणा-या पतीस पोलिस कोठली सुनावली. A case has been registered against the dead mother for killing her children and committing suicide; Solapur court sent police custody to husband
पती व त्यांच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून मृत ज्योती चव्हाण यांनी मुलगा अथर्व व मुलगी आर्या यांचा घरातील उशीने तोंड दाबून जीव गुदमारून खून केला. तसेच स्वत: सिलींग फॅनला स्कार्फच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत ज्योती सुहास चव्हाण (वय-२७,रा.राजस्व नगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सपोनि ब्रम्हदेव देशमुख यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा तपास सपोनि.देशमुख करत आहेत.
पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती सुहास चव्हाण याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पतीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात सरकार तर्फे ॲड. सार्थक चिवरी यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲड. अभिषेक गुंड, ॲड. मनोहर गाविंदे यांनी काम पाहिले.
पतीने व त्यांच्या कुटुंबियांनी चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास देत ज्योती चव्हाण (वय २७) यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ज्योती यांचे वडील दिलीप व्यंकटराव गायकवाड ( वय ५९, रा. यशवंत नगर, उमरगा, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (ता. ४) सायंकाळी मुलगा अथर्व (वय साडेतीन वर्षे) आणि मुलगी आर्या (वय २) हे व ज्योती या गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले होते. त्यानंतर शुक्रवारी उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
विवाहितेचे वडिल गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार ज्योती यांचा पती सुहास कैलास चव्हाण हा व त्याचे कुटुंबीय हे ज्योती यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मानसिक त्रास देत होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून पती सुहास चव्हाण, दीर सुशांत कैलास चव्हाण, सासू मंगल कैलास चव्हाण, नणंद सोनू लक्ष्मण जाधव, जाऊ रेखा सुशांत चव्हाण ( सर्व रा. कोंडी, उत्तर सोलापूर ) यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि देशमुख करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दोन्ही मुलांचा खुन करून आईने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे पो.नि.हनपुडे-पाटील यांनी काल सांगितले होते.
रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी आईने टी.व्ही.चा जोरात आवाज ठेवून दोन मुलांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. नंतर ओढणीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. जुळे सोलापुरातील राजस्व नगरात गुरुवारी सायंकाळी हे थरारनाट्य उजेडात आले होते. या घटनेने गुरुवारी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात पूर्णपणे सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक हनपूडे- पाटील यांनी सांगितले होते.
● पित्याचा आश्रूचा बांध फुटला
माझ्या मुलीचा विवाह त्याच्यासोबत झाल्यापासून ते आजपर्यंत मुलीला तिच्या पतीकडून खूप त्रास होत होता. तो तिला मारहाण करत होता. यामुळे ती दोन ते तीन वेळा माहेरी रहायला आली होती. शिवाय घटनेच्या दिवशी सकाळी पतीने मारहाण केल्याची घटनाही तिने फोन वरून दिली होती,असे सांगत मृत ज्योती यांच्या पित्याचा आश्रूचा बांध फुटला.
दरम्यान, मृत ज्योती सुहास चव्हाण (वय-२७), अथर्व (वय साडेतीन वर्षे) आणि आर्या (वय-२) यांचे शवविच्छेदन शुक्रवारी करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. दरम्यान, यावेळी नातेवाईकांची हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी जमली होती.
● वडिलांनी आईला खूप मारलं
नवऱ्याने मारहाण केल्याची माहिती मृत ज्योती यांनी गुरूवारी सकाळी पित्याला फोनमधून दिली. त्यावेळी मुलगा आर्यन हा ही फोन मधून वडिलांनी आईला खूप मारलं असे सांगत होता, अशी माहिती ज्योती यांच्या वडिलाने दिली.