》उदयशंकर पाटील मित्र परिवार व दादाश्री प्रतिष्ठानतर्फे उपक्रम
》से नो टू मेरा वाला वैसा नही है ।”
सोलापूर : उदयशंकर पाटील मित्र परिवार व दादाश्री प्रतिष्ठान तर्फे सुमारे ४०० महिलांना भागवत टॉकीज येथे “द केरला स्टोरी” हा सिनेमा मोफत दाखविण्यात आला. 400 women watched “The Kerala Story” free movie Dadashree Pratishthan Solapur
यावेळी भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, दादाश्री प्रतिष्ठान चे संस्थापक उदयशंकर पाटिल, रोहित पाटिल, दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीष किवडे, उद्योजक रोहन किनगी, अमित काबने, सुधीर तमशेट्टी, प्रशांत पाटिल, संजय स्वामी, दीपक काटकर, आनंद अलमनुर, भारत काळे, सोमनाथ पाटिल, दीपक काळजे, केतन माने, सतीश तमशेट्टी, नागनाथ भडांगे, निलकंठ भोगडे, पृथ्वीराज थोरात, व अन्य दादाश्री प्रतिष्ठान चे सदस्य व उदयशंकर पाटिल मित्र परिवार उपस्थीत होते.
● विविध घोषवाक्य असलेले फलक घेऊन महिलांची उपस्थिती !
शुक्रवारी सुमारे 400 महिला व मुली हा चित्रपट पाहण्यासाठी भागवत थिएटर येथे ‘गोवंश बचानी है, गोहत्या मिटानी है,’ “सनातन हिंदू धर्म की जय हो”, “नफरत नही हम प्रेम के आदी है, गर्व से कहो हम हिंदूवादी है।,” “से नो टू मेरा वाला वैसा नही है” असे घोषवाक्य असलेले फलक हाती घेऊन महिला उपस्थित होत्या. भगवी साडी, ड्रेस परिधान करून महिला व मुली उपस्थित होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● लव जिहादच्या कटकारस्थानाला हिंदू तरुणी फसू नये म्हणून प्रबोधन : उदयशंकर पाटील
भारतामध्ये विशेषतः केरळ राज्यात अनेक हिंदू बहिणी व तरुणींना भडकावून मती भ्रष्ट करून लव जिहादच्या माध्यमातून फसवून त्यांच्या आयुष्याशी खेळले जाते. अशा पद्धतीने 32 हजार तरुणींना लव जिहादच्या माध्यमातून आखाती देशात घेऊन जाऊन त्यांच्या आयुष्याशी खेळले जाते. यावर प्रबोधनात्मक असलेला हा “द केरला स्टोरी” चित्रपट सोलापूरमध्ये प्रदर्शित झाला.
या चित्रपटाच्या माध्यमातून लव जिहाद विरोधात हिंदू समाज जागा झाला आहे. हिंदू तरुणी फसल्या जाऊ नये म्हणून हा एक प्रबोधनात्मक प्रयत्न मोफत चित्रपट दाखवून करण्यात आला आहे. “माझा धर्म – माझे कर्तव्य” म्हणून हा उपक्रम राबवला आहे. लव जिहादला न फसता कटकारस्थानाला हिंदू तरुणी बळी जाऊ नये म्हणून हा प्रयत्न करण्यात आला असल्याचे यावेळी दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक उदय शंकर पाटील यांनी सांगितले.
अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करणारा हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. याबद्दल समाधान व्यक्त करून उपस्थित महिलांनी उदयशंकर पाटील मित्र परिवार व दादाश्री प्रतिष्ठानचे आभार मानले.