वैराग – माझ्या बायकोला तुझा पोरगा सारखा फोन का करतो ? पोराला नीट समजावून सांग असे म्हणून बापाला लाकडाने बेदम मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे तीन मे रोजी संध्याकाळी घडली. दरम्यान याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Son’s actions, beating the father; A case has been registered against both of them, Vairag Barshi Solapur
ज्ञानेश्वर सौदागर बाकले ( वय ३० )आणि नवनाथ लोखंडे (वय २८ , दोघे रा.उपळे दुमाला ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून राजेंद्र मारुती माने ( वय ५७ रा. सदर ) यांनी मारहाणीची फिर्याद दिली आहे . फिर्यादी हे गुरुवारी (ता. ४) संध्याकाळी घरात असताना वरील आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावून घेऊन मोटर सायकल वरून गावातील आपल्या शेतात आणले तेथे फिर्यादीस शिवीगाळ केली आणि माझ्या बायकोला तुझा पोरगा सारखा फोन का करतो , पोराला नीट समजावून का सांगत नाहीस असे म्हणून दोघांनी फिर्यादीला लाकडी काठीने सर्वांगाला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार नाळे हे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● नरखेड येथील मंदिरातून एसी चोरीस
मोहोळ – नरखेड येथील सिद्धेश्वर मंदिरातील हजार रुपये किमतीचा वातानुकूलित एसी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली. महिनाभरापूर्वीच एका भक्ताने मंदिरामध्ये एसी लावला होता . दरम्यान याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भाऊराव माधवराव पाटील ( वय ५३ रा नरखेड ता. मोहोळ) यांनी चोरीची फिर्याद दिली असून फिर्यादी हे सदर मंदिराचे चेअरमन आहेत. मोहोळ येथील भक्त हरिश्चंद्र बावकर यांनी सदर मंदिराच्या गाभाऱ्यात १२ एप्रिल रोजी वातानुकूलित एसी बसविला होता . सदर मंदिराचा दरवाजा रात्री उघडाच असतो. याची संधी साधून अज्ञात चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश करून मंदिराच्या गाभाऱ्यातील एसी ४ मे रोजी रात्रीतून चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार माने हे पुढील तपास करीत आहेत .
□ मुस्ती येथे मारहाण; मेव्हणा व पत्नीवर गुन्हा
वळसंग – बहिणीला नांदवीत का नाहीस म्हणून भाऊजीला एका मेहुण्या सोबत पत्नीने शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात घडली.
दरम्यान घटनेच्या सव्वा महिन्यानंतर वळसंग पोलीस ठाण्यात दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सूर्यकांत चटमुटके आणि ज्योती महेश कुरले (दोघे रा.डोंगर जवळगा, ता अक्कलकोट ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत महेश पंडित कुरले ( वय ३६ रा. मुस्ती ) यांनी मारहाणीची फिर्याद दिली आहे.
२९ मार्च रोजी दुपारी फिर्यादी हे गावात असताना त्यांना दोघा आरोपींनी शिवीगाळी करून दगडाने व हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार जमादार हे पुढील तपास करीत आहेत.