नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकल्याबद्दल विद्यार्थ्यांना 100 रुपये दंड भरावा लागेल किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवावे लागेल, असा आदेश डेहराडूनमधील जीआरडी निरंजनपूर अकादमीने जारी केला होता. Students fined Rs 100 for not listening to ‘Mann Ki Baat’ Narendra Modi Dehradun administration notice
या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी भाजपने देशभरात मोठी तयारी केली होती. अनेक राज्यात मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शाळा, महाविद्यालयांतही हा उपक्रम उत्साहात पार पडला. मात्र, डेहरादूनच्या जीआरडी निरंजनपुर अकॅडमीत पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. म्हणून त्यांच्याकडून १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावरुन, आता पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पालकांच्या तक्रारीवरून मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली. शाळेला 3 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीनंतर शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. मात्र, डेहरादूनच्या जीआरडी निरंजनपूर अकॅडमीत पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. म्हणून त्यांच्याकडून 100 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावरुन, आता पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, जे विद्यार्थी वैद्यकीय कारणास्तव गैरहजर होते, त्यांना मेडीकल प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे शाळेकडून शाळेच्या व्हॉट्सऍपग्रुपवर मेसेज टाकून हा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला पालकांनी होता. विद्यार्थ्यांच्या त्या आदेशाचा स्क्रीनशॉटही सार्वजनिक केला आहे. त्यामुळे, या शाळा प्रशासनाच्या संताप व्यक्त केला जात आहे.
नॅशनल एसोसिएशन फॉर पॅरेंट्स अँड स्टुडेंट्स राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. मुख्य शिक्षण अधिकारी डेहरादून यांना पत्र लिहून संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, शिक्षण विभागाने या शाळेला नोटिस जारी करत तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.
दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार प्राप्त होताच, मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी शाळा प्रशासनाला नोटीस जारी करत ३ दिवसांत उत्तर आदेशावर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचेही संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर, तक्रारकर्त्या संघटनेकडेही पुरावे मागितले आहेत.
याप्रकरणी लेखी तक्रार प्राप्त होताच, मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी शाळा प्रशासनाला नोटीस जारी करत ३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचेही संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर, तक्रारकर्त्या संघटनेकडेही पुरावे मागितले आहेत.