सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. During the press conference, Ajit Pawar was asked by Sharad Pawar to be absent Pandharpur political Solapur
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊ नये यासाठी पक्षातील अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा परत घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दरम्यान शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित होते.
त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर यावर देखील शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मीच अजित पवार यांना पत्रकार परिषदेत न येण्यास सांगितलं होतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. मात्र अजूनही मदत मिळालेली नाहीये. राज्यात लोकांना बदल हवा आहे. विरोधकांची एकजूट व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》शरद पवारांनी राजीनामा का मागे घेतला, राज ठाकरेंनी सांगितले कारण
○ अजित पवार उद्या शरद पवारांनाही गप्प बसायला लावेल
रत्नागिरी : रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता ? राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तू गप्प बस, तू शांत बस, माईक हातातून घे. यामुळे शरद पवार साहेब म्हणाले असतील, मी आता राजीनामा दिला तर हा माणूस असा वागतोय. उद्या मलाही गप्प बसायला लावेल. त्यामुळेच पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला असेल, ” असे ठाकरेंनी मत व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खरोखरच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागत होते, ते पाहून शरद पवारांनी कदाचित निर्णय बदलला असेल, असा चिमटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काढला. ते रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दिलेला राजीनामा परत चितला. चार दिवस चाललेल्या राजीनामानाट्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर हात घालताना म्हणाले की, मागे कोकणात आलो होतो. सभा सगळ्याच ठिकाणी करायचे ठरले, पहिल्यांदा रत्नागिरी निवडले. बरेच विषय तुंबलेत, नालेसफाई होणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती काही वर्षे समजेनाशी झाली. आमदार समोर आले की सध्या कुठाय असे विचारावे लागते, असे मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या रत्नागिरीतील सभेदरम्यान म्हणाले.
यावेळी त्यांनी बारसूसह मुंबई गोवा महामार्गासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो काल संपला. त्यांना खरेच राजीनामा द्यायचा होता असे मला वाटते. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले ते पवारांच्या डोळ्यादेखत होत असताना मी आता राजीनामा दिला हे असे वागताहेत. उद्या ते जसे बोलत होते तसे मलाही सांगतील या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा. होतेय ते बरे होतेय अशा उकळ्या फुटत होत्या. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.