● राज्यात सोलापूरचा लौकिक वाढला
● कोट्यवधी रुपये मोजत पेटंटची खरेदी
सोलापूर : युवा संशोधक आणि इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केले. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना कल्पना सुचली. Tata cars will have a patent to be a part of Marathmola engineer of Solapur यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. त्यांच्या या पार्टमुळे गाड्यामधील होणारे प्रदूषण आता कमी होणार आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यांनी केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल बुऱ्हाणपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी याबाबत माहिती दिली. राहुल बु-हाणपुरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पदवी प्राप्त केली. वडील साडीच्या दुकानात कर्मचारी तर आई गृहिणी अशी घरची स्थिती असतानाही राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केले. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना कल्पना सुचली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. तो चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतला आहे. टाटा मोटर्स कडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे, असे राहुल यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत उद्योगपती किशोर चंडक, शिक्षक संपत झळके अतुल बावटणकर, बसवराज बऱ्हाणपुरे, माऊली झांबरे, चन्नवीर चिटे आदी उपस्थित होते.
》 टाटा कंपनीला पार्ट दिला
राहुल बुऱ्हाणपुरे यांना तीन ते चार कंपन्यांनी संपर्क साधला आणि या पेटंटची मागणी केली होती. टाटा मोटर्स कंपनी ही देशी कंपनी आहे आणि टाटा कंपनीचं देश कार्यात नेहमीच अधिक योगदान असते म्हणून याच कंपनीला त्यात राहुल बुऱ्हाणपुरे यांनी आपलं पेटंट दिले.
● प्रदूषण नियंत्रण करणारा पार्ट तयार केला
सध्याच्या वाहनांमध्ये इ. जी.आर सिस्टमचा वापर केला जातो. या पार्टचे काम प्रभावीपणे होण्यासाठी पीसीएम या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सरमधून बाहेर फेकली जाणारी ३० टक्के प्रदूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिन मध्ये सोडली जाते. यामुळे प्रदूषणात ३० टक्के एवढी घट होईल, याशिवाय इंधनाची ही १० टक्के बचत होते, असं राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सांगितले.