पंढरपूर – शरद पवारांनी अभिजित पाटील यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज भगीरथ भालके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्यामुळे पंढरपूरात खळबळ उडाली आहे. Nana Patole – Gift of Bhagirath Bhalke; Closed room discussion for a long time Solapur Political Congress Nationalist भालके कुटुंबियांना संकटांना भालके कुटुंबावर जे काही संकट आले आहे, त्यांना बाहेर काढण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल अशी माहिती नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान भगीरथ भालके यांनी नाना पटोले यांची भेट घेतल्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पंढरपुरात रंगल्या आहेत. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, अमर सूर्यवंशी, राहुल पाटील, संदीप पाटील, सागर कदम, नागेश गंगेकर आदी उपस्थित होते.
मागील काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष कमकुवत झाला असून पदाधिकार्यांमध्ये देखील मतभेद असल्याबाबत पटोले यांना विचारणा केली असता आता सर्व गटतट एकत्र आले असून त्यांच्यामधले मतभेद दूर करण्यात आले आहेत. सुशीलकुुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पुन्हा ताकदीने पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर लोकसभेची जागा देखील शिंदे यांनीच लढवावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु त्यांनी दुसरा पर्याय दिला तर यावर देखील चर्चा करणार असल्याचे सांगितले. यामुळे राष्ट्रवादीने सोलापूर लोकसभेवर केलेला दावा पटोले यांनी अमान्य असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान राज्यात आता महाविकास आघाडी असून सर्वच लोकसभा व विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. विधानसभा व लोकसभेच्या जागा पूर्वी दोन पक्षात वाटून घेतल्या जात होत्या. आता यामध्ये शिवसेना आली आहे. यामुळे जागा वाटपाबाबत फेरविचार करावा लागणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी नाना पटोले यांची संत कैकाडी मठात भेट घेतली. यावेळी दोघांनीच बंद खोलीत बराचवेळ चर्चा देखील केली. या विषयावर बोलताना पटोले यांनी, स्व.भारत भालके यांच्या बरोबर मी काम केले असून त्यांच्या कुटुंबाशी प्रेमाचे संबंध आहेत. भगीरथ हे आज आमच्या पक्षात नसले तरी त्यांच्या परिवारावर जे संकट आले आहे. त्यामधून त्यांना बाहेर काढण्याची कॉंग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे सूचक विधान केले. कॉंग्रेसमध्ये त्यांनी येणे न येणे हा त्यांचा विषय असल्याचे देखील सांगितले.
● लोकसभा सुशीलकुमार शिंदे यांनी लढवावी
सोलापूर लोकसभेची निवडणूक जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच लढवावी अशी आमची आग्रही मागणी असून याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वीच लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र , याबाबत त्यांनी दुसरा पर्याय दिला तर त्यावर देखील विचार करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.