सोलापूर : सोलापुरात आलेल्या पंढरपूरच्या नेत्यांना विठ्ठल परिवाराची मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल. त्याच वेळी एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काळे, भालके आणि पाटील यांना दिल्याची माहिती आहे. Sharad Pawar will pay attention to political differences in Pandharpur, Absent leaders met in Solapur and raised their concerns Bhagirath Bhalke Abhijit Patil
यातून पंढरपूरच्या राजकारणाची दिशा ठरविणारा विठ्ठल परिवार एकत्र ठेवण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. पंढरपूर कार्यक्रमातील गैरहजर नेत्यांनी आपणास निमंत्रण नसल्याची खंत व्यक्त करीत आज सोलापुरात शरद पवारांची भेट घेतली.
भगिरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील यांची उपस्थिती होती. यावेळेस पवारांनी म्हणणे ऐकून घेऊन येणा-या काळात विठ्ठल परिवारातील नेते राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित केला. यास भगिरथ भालकेसह इतरांनी प्रतिसाद दिला.
मुंबईतील बैठकीला भगिरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील आणि मला बोलवणार आहेत, तसेच अभिजित पाटील यांनाही निरोप देतो, असे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनाही बैठकीला बोलवतील, अशी अपेक्षा आहे, असेही कल्याणराव काळे यांनी नमूद केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परिवारातील सर्व नेत्यांची लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल आणि त्यात सर्व मतभेद मिटविण्यात येतील, अशी ग्वाही शरद पवार यांनी पंढरपुरातील नेत्यांना सोलापुरात दिली.
श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण भगिरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील यांना नव्हते. तसेच, पुढील कार्यक्रमामुळे पवारांना काळे यांच्या कार्यालयात जाता आले नव्हते, त्यामुळे काळे यांच्यासह भालके आणि पाटील हे नाराज होते. आज सकाळी त्यांनी सोलापूर गाठत पवारांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांनी पवारांसमोर बोलून दाखवली.
सोलापुरातील शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की, आम्ही सर्वांनी आज सकाळी सोलापुरात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखान्यांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
विठ्ठल परिवारातील नेत्यांची आपण मुंबईत एक बैठक घेऊया. एकमेकांच्या संस्थेत कुणी हस्तक्षेप करायचा नाही, असं पवारांचं मत आलं. त्यामुळे बैठकीत हे सर्व सांगितले जाईल. अभिजित पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संस्थेत निवडणूक लावणं, तसेच समोरासमोर जाणं, हे काय बरोबर दिसणार नाही. त्यामुळे शरद पवार स्वतःच म्हणाले की, आपण एक बैठक घेऊया आणि त्यातून आपण मार्ग काढूयात. मी त्यांच्याशी बोलतो, असेही पवार म्हणाल्याचे माहिती आहे.