मुंबई : राज्यात लवकरच दोन टप्प्यांमध्ये सुमारे ५० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. Mega Teacher Recruitment Mega recruitment will be held in July-August in the state
राज्यातील अडीच लाख उमेदवार आतूरतेने वाट पाहत असलेल्या शिक्षक भरतीची परिक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. शिक्षक भरतीसाठीची टीईटी परिक्षा जवळपास अडीच लाख उमेदवारांनी दिली होती. त्यानंतर हे उमेदवार शिक्षक भरती कधी होणार याची प्रतिक्षा करत होते. 15 मे नंतर संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर राज्यात शिक्षक भरतीसाठीची परिक्षा घेतली जाणार आहे. राज्य सरकारला भरती प्रक्रियेचे वेगाने नियोजन करावे लागणार आहे.
राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून भरतीबाबत संकेत दिल्यानंतरही पवित्र पोर्टलवर कोणत्याही हालचाली होत नसल्यानं उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. राज्यातील शिक्षक भरती कधी होणार असा सवाल उपस्थित करुन सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा समोर येणार असल्याचे केसरकर म्हणाले. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती करण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिक्षकभरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा सरकारचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. मात्र, विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे असंही केसरकर म्हणाले.
प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का याचा विचार आम्ही करत आहोत असेही केसरकर म्हणअसं केसरकर यांनी म्हटलं.शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या एकच गणवेशाबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.
आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शिक्षक भरतीचा आकडा कळणार असल्याची माहिती देखील केसरकर यांनी दिली आहे. तर शिक्षकांच्या बदल्याबाबत आपण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.