सोलापूर : पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज लष्कर येथे मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. मृताच्या नातेवाईकास नुकसानभरपाई द्यावी, म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या घटनेस महापालिकेला जबाबदार धरले जात आहे.
नळाला पाणी कमी दाबानं येत असल्यानं मोटारलावून पाणी घेण्यात येतं. हा बालक मोटार लावलेल्या ठिकाणी आला असताना उघड्या वायरवर त्याचा पाय पडला आणि शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अवेळी पाणी सोडणाऱ्या पालिकेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून लहानमुलाचं शव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.
मयताचे काकाने या घटनेस पूर्णपणे महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले . महापालिकेच ढिसाळ नियोजन आणि वेळेवर, नऊ दिवस पाणी सोडले जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने पाण्याची मोटार लावावी लागली. संबंधित महापालिका अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली.
शांतराज युवराज तल्लारे ( वय १०, रा. इमानियार चौक, कुंभार गल्ली, लष्कर) असे त्या मुलाचे नाव आहे. नळाला पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे तल्लारे कुटुंबिंयानी पाणी ओढण्यासाठी मोटार लावलेली होती. पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला.
ही घटना कळताच त्याला उपचारासाठी आई वडिलांनी व शेजाऱ्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी आक्रोश केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● थेट पोलिसाच्या श्रीमुखात लगावली, दोघांना पोलिस कोठडी, पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, घडला प्रकार
सोलापूर : वाहन चालविण्याचा परवाना मागितला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजता शहरातील सावरकर चौक येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या
गुन्ह्यानुसार, पोलिस कॉन्स्टेबल विजय कोळवले, शिवाजी आवटे हे शहरातील सावरकर चौक येथे रविवारी (ता. ७) ११ वाजता सरकारी गणवेशात शासकीय काम करत होते. या दरम्यान प्रवीण तानाजी लवटे (वय २५, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर), नितीन तानाजी लवटे (वय २२, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना मागितला.
मोटारसायकल चालविण्याचा परवाना दाखविण्याच्या कारणावरून दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून विजय कोळवले यांना चापट मारली. तसेच शासकीय काम करत असताना हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केली, अशी फिर्याद दिली आहे. याबाबत त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.