मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आम्ही निर्णय घेणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार, असेही कोर्टाने आज स्पष्ट केले आहे. Supreme Court verdict, relief to Eknath Shinde; If Uddhav Thackeray had not resigned… Power Struggle Result Maharashtra Politics Speaker त्यामुळे सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे गेले असल्याने 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता नाही.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं, अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार वाचले आहे. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा या राजकारणाचा मोठा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज आला. आपण राज्यघटनेच्या तरतुदींनुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून न्यायालयाच्या निकालाचा मान राखायला पाहिजे, त्याने दिलेल्या निकालाचे स्वागत करून तो मान्य करायला पाहिजे.” असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केले.
एखाद्या पक्षातील असंतोष हा फ्लोअर टेस्टचा आधार ठरू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. पक्षांतर्गत वाद संपवण्यासाठी बहुमत चाचणी गरजेची नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. मुळातच बहुमत चाचणीचा निर्णयच चुकीचा होता, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकाल वाचताना स्पष्ट केले आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात निकाल दिला जात आहे. सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा व्हीप घटनाबाह्य असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. व्हीप फक्त राजकीय पक्षाचा नेताच देऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत. आमदार भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत अखेर आज सुप्रीम कोर्ट निकाल देत आहे. यामध्ये हे प्रकरण आता 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचे हे प्रकरण आहे. त्यावर हे घटनापीठ निर्णय घेणार आहे.
एखाद्या पक्षातील असंतोष हा फ्लोअर टेस्टचा आधार ठरू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. पक्षांतर्गत वाद संपवण्यासाठी बहुमत चाचणी गरजेची नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. मुळातच बहुमत चाचणीचा निर्णयच चुकीचा होता, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकाल वाचताना स्पष्ट केले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर कधीही निकाल येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंच घर असलेलं मातोश्री या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सामना ऑफिस या ठिकाणी खासदार संजय राऊत उपस्थित असल्यामुळे येथेही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Maharashtra political crisis | Supreme Court refuses to give relief to Uddhav Thackeray as it observes that he did not face Floor test pic.twitter.com/z6X7EOMTv8
— ANI (@ANI) May 11, 2023
राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणी लागणाऱ्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणं देणं नाही, आमदारांची खुर्ची टिकवण्यासाठी धावपळ सुरू आहे. या शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी सद्य स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा हा पोरखेळ अनेक वर्षांपासून सुरू असून लोक त्याला कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले. ते नांदेड जिल्ह्यातील तामसा इथे बोलत होते.
आमदार अपात्र ठरल्यावर सरकार आणि गद्दारांचा गट संपुष्टात येईल. शिवसेनेचा नेता म्हणून मला या गोष्टीची खात्री आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभर राहणार नाही. हे सरकार जाईल, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल गद्दारांना धडा शिकवणारा असेल असे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. गद्दारी कोणालाच मान्य नाही. जनतेलाही मान्य नाही. सगळे एकनिष्ठ सैनिक उध्दव ठाकरेंसोबत आहेत. मी न्यायालयाला विनंती करु शकत नाही. मी देवाला प्रार्थना केली आहे की आजचा निकाल उध्दवजींच्या बाजूने लागू दे, असे खैरे म्हणाले. उदय सामंत हे उध्दव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सत्तासंघर्षावरील निकाल शिंदे गटाच्या विरोधात आला तर मुख्यमंत्रीपदी कोण असणार? यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवाने आमच्या विरोधात लागला तरी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच असतील. विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यामुळे ते 16 आमदारांना अपात्र ठरवू शकत नाहीत’, असे गायकवाड म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठे विधान केले आहे. 16 नाही तर 39 आमदार अपात्र ठरणार, असे ते म्हणाले आहेत. आमच्या दोन याचिका आहेत. एक 16 आमदारांची आहे आणि दुसरी 23 आमदारांची आहे. ज्यावेळी 16 आमदारांचा निकाल लागेल. तोच निकाल 23 आमदारांच्या बाबतीत लागू होईल, असे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत घटनापीठ निकाल दिला आहे.
शिवसेनेतील बंडानंतर ३६ बंडखोर आमदारांनी २३ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ पक्षनेतेपदी निवडले. परंतु, दुसऱ्या दिवशी २४ जूनला शिवसेनेने शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी तत्कालीन उपाध्यक्षांकडे केली. २५ जूनला उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या. यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २६ जून २०२२ रोजी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत शिवसेना, केंद्र सरकार, महाराष्ट्र पोलीस तसेच विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस पाठवली होती.
● सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका होत्या ?
– सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.
– पहिल्या याचिकेत एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांच्या निलंबनाला आव्हान दिले आहे.
– दुसऱ्या याचिकेत ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
• तिसरी याचिका ठाकरेंच्या 14 आमदारांच्या निलंबनासंदर्भातील आहे.
– चौथ्या याचिकेत सुभाष देसाईंनी जुलैमधील विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची विनंती केली आहे.
● सुप्रीम कोर्ट म्हणाले…
– राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलवायला नको होतं
– राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं आवश्यक.
– ‘मीच खरी शिवसेना’ असा दावा कुणीही करू शकत नाही.
– विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वत: ला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं, शिंदे गटाकडून भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक बेकायदेशीर.
》 सत्तासंघर्षाचा निकाल हे 5 न्यायाधीश देणार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
न्या. एम. आर. शहा
न्या. कृष्ण मुरारी
न्या. हिमा कोहली
न्या. नरसिंहा
( या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ आज हा निकाल दिला आहे.)