● विशेष विमानाने शिंदे बंगळुरूकडे रवाना, ठाण मांडून पक्षनिरीक्षक पदाची जबाबदारी पार पाडणार
नवी दिल्ली /सोलापूर : कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यामध्ये सुशिल कुमार शिंदे यांचा सहभाग आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांची काँग्रेसने निरीक्षक म्हणून निवड केली आहे. आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षक उपस्थित राहणार असून, ते पक्षाच्या हायकमांडला अहवाल सादर करतील. Sushilkumar Shinde of Solapur named in Karnataka Chief Minister Selection Committee as party inspector special plane leaves High Command
कर्नाटकात बहुमताच्या वाटेवर असतानाच काँग्रेसपुढे मुख्यमंत्रीपदावरून मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ सिध्दरामय्यांच्या गळ्यात पडते का डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीआधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. सिध्दरामय्यांनी 2013 ते 2018 पर्यंत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. तर शिवकुमारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे घवघवीत यश पाहून कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार हे भावूक झाले. शिवकुमार हे 2020 मध्ये दिल्लीतील तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होते. मनी लाँड्रिंगप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तिहार जेलमध्ये जाऊन शिवकुमार यांची भेट घेतली होती. हा प्रसंग सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.
कर्नाटक सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंची निवड केली आहे. कर्नाटक सत्तास्थापनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर काँग्रेस हायकमांडने सोपविली आहे. त्यानुसार रविवारी एका विशेष विमानाने शिंदे बंगळुरूला रवाना झाले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकासाठी पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जबाबदारीसंदर्भात शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कर्नाटक सत्तास्थापनेत पर्यवेक्षकाची भूमिका बजावणार आहे. कर्नाटकात विधानसभेचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसला स्पष्ट बहुमत जनतेने दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. डी के शिवकुमार, सिध्दरामैय्या यांच्यासमवेत आणखी दोन नेत्यांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाचारण केल्याचे समजते आहे. दरम्यान, कर्नाटकातील सत्ता तिढ्याचा अहवाल सोपविण्याचे निर्देश हायकमांडने शिंदेंना दिले आहेत.
नवी दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा सुशीलकुमार शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून तात्काळ रवाना होण्यासाठी आदेश प्राप्त झाला. त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरूला नेण्यासाठी विशेष विमानही सोलापुरात आले. शिंदे हे या विशेष विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. मुख्यमंत्रिपदाची निवड प्रक्रिया होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. पक्ष निरीक्षकपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजताच सात रस्त्यावरील जनवात्सल्य निवासस्थानी स्थानिक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.