सोलापूर : एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहीत तरुणाने रेल्वे खाली झोकुन देऊन आत्महत्या केली. ही घटना छत्रपती संभाजी तलाव परिसरातील रेल्वे पुलाखाली शनिवारी (ता. 13) दुपारी उघडकीस आली .
विरेश श्रीपाद जीर (वय २८ रा.न्यू सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दुपारी त्याने तलावाजवळील एका झाडाखाली आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर त्याने पुलाखाली रेल्वे खाली आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी रेल्वे अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याचे आढळून आले. त्याच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत विरेश जीर हा विवाहीत असून तो एका खाजगी फायनान्स कंपनी कामाला होता . या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही .
》 कार रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षामधील तिघेजण जखमी
सोलापूर : अक्कलकोट येथील महालक्ष्मी मंदिराच्या समोर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. कार चालकाने भरधाव वेगाने पाठीमागून येऊन रिक्षाला धडक दिली.
यात रिक्षामधील तिघेजण जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वसंत बिराजदार (वय-३७,रा.किसन नगर,अक्कलकोट रोड) हे रिक्षा घेऊन जात होते. तेव्हा रिक्षामध्ये तीन ते चार प्रवासी होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारने रिक्षाला जोरदार धडक दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या अपघातात वसंत हे गंभीर जखमी झाले. शिवाय रिक्षामधील धनराज धनशेट्टी (वय-१५,रा.दत्त नगर) या मुलालाही डोक्याला जखम झाली आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षा पलटी झाली. अपघातानंतर कार चालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी झाली आहे.