मोहोळ : प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने मयताची पत्नी व तिचा प्रियकर यांनी वडाचीवाडी गावचे हद्दीतील शेतामध्ये खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात प्रेत टाकून दिले. या प्रकरणात मयताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mohol The wife killed the husband who was an obstacle in love with the help of his lover, Vadachiwadi
दादासाहेब हणमंत पवार ( वय ३६ रा. हिवरे )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार दादासाहेब हणमंत पवार हे २६ एप्रिलपासून घरी आले नव्हते, म्हणून आजू बाजूच्या परिसरात व नातेवाईक यांचेकडे शोध घेवून ३० एप्रिल रोजी मोहोळ पोलिस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली होती.
दरम्यान कामती पोलिस स्टेशन हद्दीत परमेश्वर पिंपरी गावच्या शिवारात बशीर बागवान यांच्या शेताजवळ कॅनॉलमध्ये एक अनोळखी प्रेत वाहत आले होते ते पुरुष जातीचे अंगावर करड्या रंगाची अंडरविअर व हातात लाल रगाचा गोफ होता. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली. आजू बाजूच्या पोलिस ठाण्यात युटूब चॅनल व्दारे मयताची ओळख पटवण्यासाठी अवाहन करण्यात आले.
मोहोळ पोलिस ठाण्यातील बेपत्ता राजिस्टर नंबर चे तपासी अंमलदार संतोष चव्हाण व बेपत्ता मयताचे नातेवाईक यांनी मयताचे फोटो पाहिले. मृतदेह दादासाहेब पवार यांचेच असल्याची नातेवाइकांची ओळख झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मयताचा सख्खा भाऊ राजेंद्र हणमंत पवार व मिसींगची खबर देणारे गोविंद गुरुअप्पा पवार, दिनेश धोत्रे, समाधान हरिदास पाथरूट व आनंदकुमार श्रीरंग शिंदे या नातेवाइकांनी चौकशीमध्ये पोलिसांना माहिती सांगितली होती, की कोन्हेरी येथे राहणारा अमोल उर्फ कृष्णा अंगद पांढरे हा दुधाचा व्यवसाय करीत असल्याने मागील सहा महिन्यांपासून वस्तीवर दुध काढून घेवून जाणेकरिता तो येत जात होता.
दरम्यान मृताची पत्नी रंजना दादासाहेब पवार व अमोल उर्फ कृष्णा अंगद पांढरे यांचे प्रेमसंबध चालू झाले होते. त्या दोघा नवरा बायकोमध्ये यामुळे सारखे भांडण व्हायचे, याबाबत वाद वाढू नये म्हणून हायवेवर असणारे हॉटेल संकेत येथे अमोल पांढरे यास नातेवाईकांनी बोलावून रंजना बरोबर असलेले प्रेम संबंध संपवण्याबाबत समजावून सांगितले होते. त्यास तशी ताकीद दिली होती. तरीही कोणी नसताना अमोल हा शेतातील वस्तीवर येत जात होता. त्यामुळे रंजना व दादासाहेब यांच्यात पुन्हा वाद वाढला. त्यामुळे रंजना व अमोल उर्फ कृष्णा पांढरे यांच्या प्रेमात अडसर ठरणारा रंजनाचा नवरा दादासाहेब पवार यास २६ एप्रिल रात्री १० वा . ते २८ एप्रिल सकाळी सव्वा नऊ वाजणेपूर्वी वडाचीवाडी गावचे हद्दीत शेतामध्ये दादासाहेब पवार यांना कोणत्यातरी हत्याराने डोक्यावर जबर मारहाण करून जीवे ठार मारले. मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला.
यावरून पोलिसानी मयत दादासाहेब पवार यांची पत्नी रंजना दादासाहेब पवार व तिचा प्रियकर अमोल उर्फ कृष्णा अगद पांढरे या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कामती पोलिस ठाण्यातील पोहे कॉ जिवराज जनार्धन कासवीद यांनी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करित आहेत.