सोलापूर – श्वानदंशाने जखमी झालेला रोहान वसीम शेख (वय ९ वर्षे रा. शास्त्रीनगर सोलापूर )हा उपचारादरम्यान रविवारी (ता. 14) दुपारी मरण पावला. Death of child injured by dog bite Solapur Galfas suicide Mukadam Government Hospital
२० एप्रिल रोजी शास्त्रीनगर परिसरात भटक्या कुत्र्याच्या दंशाने काही जण जखमी झाले होते. त्यात रोहान शेख याच्या देखील समावेश होता. त्यावेळी शासकीय रुग्णालयात उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आले होते. काल शनिवारी त्याला त्रास होत असल्याने पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो रविवारी मरण पावला. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.
● सारोळे येथे लाकडी दांडक्याने मारहाण दोन महिला जखमी
सारोळे (ता.मोहोळ) येथे लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत उषा पांडुरंग लादे (वय ५० ) आणि अश्विनी अनिल बनसोडे (वय २६ रा .सारोळे ) या दोघी जखमी झाल्या. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्या दोघी घरातील अंगणात काम करीत होत्या.
त्यावेळी अनिल मिलिंद बनसोडे, सुदामती बनसोडे आणि अन्य दोघांनी मिळून त्यांना अज्ञात कारणावरून मारहाण केली . त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून मदन सरवदे (भाऊ) यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले . या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● मुळेगाव येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – एका ५० वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना मुळेगाव तांडा (ता.दक्षिण सोलापूर ) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
लक्ष्मण महादेव हाटकर (वय ५० रा. मुळेगाव तांडा) असे मयताचे नाव आहे. रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मुळेगाव तांडा गावातील कमानीच्या आत असलेल्या एका झाडाला स्कार्फच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. लक्ष्मी हाटकर (पत्नी) यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले . या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पाणी भरताना मोटारीचा शॉक बसल्याने महिलेचा मृत्यू
नळाला विजेची मोटार लावून पाणी भरत असताना शॉक बसल्याने शबनम अब्दुल रजाक पिरजादे (वय ४२) ही महिला उपचारापूर्वी मरण पावली . ही घटना मजरेवाडी येथील आनंदनगर भाग-१ येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
त्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरात विजेची मोटर लावून पाणी भरत होत्या . त्यावेळी अचानक शॉक बसल्याने त्या बेशुद्ध झाल्या . मेहबूब (मुलगा) यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या उपचारापूर्वीच मयत झाल्या . या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे.
● अकलूज येथे पूर्वीच्या भांडणावरून कोयत्याने मारहाण; महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर – पूर्वीचे भांडण आणि घरासमोर येरझाऱ्या मारल्याच्या कारणावरून एका तरुणाला कोयता, दांडका आणि उलट्या तलवारी मारून जखमी करण्यात आले . ही घटना अकलूज येथील इंदापूर रोडवर असलेल्या बोडके पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
विकास बाळू भोसले (वय २८ रा.राऊत नगर अकलूज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूजच्या पोलिसांनी शुभम दीपक ओरसे, कुणाल ओरसे, लखन खिल्लारे, सलमान शेख, अंबादास ओरसे आणि त्याची पत्नी (सर्व रा.राऊतनगर अकलूज ) अशा ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी विकास भोसले हा पेट्रोल पंपाजवळून जात होता. त्यावेळी वरील आरोपीने अडवून त्याला मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार गुरव करीत आहेत.
● घाटणे येथील शेतकऱ्यास १४ लाखास गंडविले; जालनाच्या मुकदमावर गुन्हा
सोलापूर – शेतातील ऊस तोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून एका शेतकऱ्याला १४ लाख ६० हजार रुपयास फसविल्याची घटना कुर्डूवाडी येथे नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणात कुर्डूवाडीच्या पोलिसांनी लक्ष्मण शिवाजी पारवे (वय ३५ रा. आसनगाव जि.जालना) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात निंबाळकर या शेतकऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. लक्ष्मण पारवे हा १६ जून ते १० मे या दरम्यान ऊसतोड मजूर पुरवते म्हणून त्यांच्या कडून उचल घेऊन करार केला होता. कराराप्रमाणे वेळेत मजूर पुरवले नाही तसेच पैसे परत न देता फसवणूक केली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार मंडलीक पुढील तपास करीत आहेत.