● भाजप मविआमध्ये वाद असल्याचे वातावरण निर्माण करतंय
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे लढणार आहे, असे जयंत पाटील यांनी बैठकीनंतर म्हटले आहे. Will contest Lok Sabha, Vidhan Sabha elections together; Leaders of the Mahavikas Aghadi insist on debate environment BJP Silver Oak महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये येत्या काही दिवसांत जागावाटप होणार आहे. बैठकीत कर्नाटक विधानसभा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. पुढची वज्रमुठ सभा पुण्यात होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी रविवारी ही बैठक झाली. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे , खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान आदी उपस्थित होते.
कर्नाटकात काँग्रेस नाही तर विरोधी पक्ष जिंकला असून कर्नाटक तो झांकी है, पूरा देश बाकी है असे संजय राऊत यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकात महाराष्ट्रातही कर्नाटकसारखा विजय महाविकास आघाडी मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडीमध्ये मतभेद आहेत असे जाणीवपूर्वक पसरवले जात असून आघाडी मजबूत असून कुणालाही आमच्या नात्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे सरकार पाडले ते कसे चुकीचे होते आणि राज्यातील मिंधे सरकार कसे बेकायदेशीर आहे हे राज्यातील जनतेला आम्ही समजून सांगणार आहोत, असे ते म्हणाले. सर्वेच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला आहे आणि मिंधे सरकारवर कडक ताशेरे ओढले गेले हे समजून घ्या असेही ते म्हणाले. ‘आम्ही मजबूत लोक आहोत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे असहाय्य आहेत. ते दिल्लीकडे असहाय्यतेने बघतात. असे लोक आम्ही कधीच पाहिलेले नाहीत.’, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव… pic.twitter.com/gMNMWtW3JU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 14, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाविकास आघाडीमध्ये आणखी एक पक्ष येणार असल्याचे समजते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवून महाराष्ट्राला सक्षम पर्याय देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल यावर आजच्या बैठकीत एकमत झाले, अशी माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली. उन्हाळ्याची तीव्रता कमी झाल्यानंतर ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकप्रमाणेच राज्यातही आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्षांचे नेते बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘कर्नाटकात 40 टक्के भ्रष्टाचार होता, तर महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचार आहे. सध्याचे सरकार हे भ्रष्ट आहे. आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. लवकरच जागावाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. मविआतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत’, असे राऊत म्हणाले.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत चर्चा झाली. तसेच येत्या काळात संयुक्त सभांचा धडाका वाढवण्यावरही शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडी एकसंध, भक्कम असून आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवून आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला.
कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल असलेला प्रचंड राग निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झाला असे सांगतानाच येत्या काळात महाराष्ट्रातही महाविकास आघाडी एकत्रितपणे भाजपला हद्दपार करेल, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील भाजपच्या असंवैधानिक सरकारचे पानिपत कसे करता येईल यावरही चर्चा झाली.
कर्नाटकातील सरकार कसे पाडले व जनतेच्या मनात भाजपबद्दल कसा राग निर्माण झाला हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहोत, असे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नसून मूळ मुद्याला बगल देण्यासाठी भाजप आमच्यामध्ये वाद असल्याचे वातावरण निर्माण करत आहे. राज्यातील शिंदे-भाजप सरकार असंवैधानिक आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्यांनी राज्यात येण्यासाठी सुरक्षा मागितली त्यांनाच भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री बनवले. याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार, असा इशाराही पटोले यांनी दिला.