बार्शी : शासकीय परवानगी न घेता विनापरवाना सांस्कृतिक लावणी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांची गर्दी जमवून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी प्रजा शक्ती पार्टीचे राज्य प्रदेश अध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड (रा. आगळगाव रोड, बार्शी) वर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पो. कॉ. अमोल वाडकर यांनी फिर्याद दिली आहे. A case has been registered for taking Gautami Patil’s program without a license, a case has also been registered against Gautami, the organizer Barshi
दि १२ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील कुर्डुवाडी रोड जैन मंदिर जवळ शेटे मळा येथे गौतमी पाटील यांच्या लावणी महोत्सव कार्यक्रमासाठी गायकवाड यांनी सशुल्क पोलीस बंदोबस्त व परवानगी मिळण्याबाबत अर्ज पोलिसांकडे केला होता. त्या अनुषंगाने कार्यक्रमात अनुचित प्रकार पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता महावितरणचे वीज पुरवठा मंजुरी बाबतचे प्रमाणपत्र, आपत्कालीन अग्निशामक यंत्रणा, अम्ब्युलन्स व वैदयकीय यंत्रणा उपलब्ध करून दिले बाबतचे प्रमाणपत्र आदी बाबीची पुर्तता केल्यानंतर व पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरल्यानंतरच कार्यक्रमास परवानगी व सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे पोलिसांनी गायकवाड यांना कळविले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परंतु गायकवाड यांनी या बाबींची पुर्तता न करता तसेच कोणतीही परवानगी न घेता दि १२ रोजी रात्री ८ वा ते १० वा च्या दरम्यान कुर्डुवाडी रोड जैन मंदिर जवळ शेटे मळा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमास अंदाजे ७०० ते ८०० जनसमुदाय जमा करुन विनापरवाना लोकांची गर्दी जमवली. सार्वजनिक शांतता भंग केली आणि कार्यक्रम घेऊन जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदीचा आदेश लागू असताना गर्दी जमवली अशा आशयाची फिर्याद दिली आहे.
● गौतमी पाटील विरोधात पोलिसांत तक्रार
गौतम पाटील हे नाव सर्वांनाच परिचित आहे. त्यातच आता गौतमी पाटील विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी ही तक्रार केली आहे. गौतमीने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे आता गौतमीच्या अडचणी वाढल्या आहेत.