☆ सहा वर्षीय मुलाला १० लाख देण्याचे आदेश
☆ जुळे सोलापुरात घडली होती घटना
• सोलापूर : बांधकाम व्यवसाय, शेअर गुंतवणूक आणि भिशी चालविण्याचा व्यवसायातून कर्जबाजारी झाल्यानंतर आपल्या शिक्षक पत्नीचा तीक्ष्ण शस्त्राने खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या Guruji’s husband who killed his teacher’s wife was sentenced to life imprisonment, the incident happened in twin Solapur Solapur Zilla Parishad Share Market विकास विश्वनाथ हरवाळकर (वय ३६ रा. नीता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) या शिक्षकाला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी सोमवारी ठोठावली. तर आई-वडिलांपासून पोरका झालेल्या त्याच्या ६ वर्षीय मुलाला १० लाख रुपये नुकसान भरपाई आरोपीला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी विकास विश्वनाथ हरवाळकर आणि त्याची पत्नी
अर्चना हरवाळकर हे दोघे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. ज्यादा पैसा मिळवण्याच्या आशेने त्याने बांधकाम व्यवसाय, शेअर गुंतवणूक आणि भिशी चालविण्याचा व्यवसाय केला. त्यातून तो कर्जबाजारी झाला होता.
घटनेच्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्या मामाचा मुलगा प्रणय यशवंत कांबळे, (रा. आदित्य नगर) यांच्या व्हॉट्सअप मध्ये फाशीची दोरीचे चित्र दाखवून त्याच्या बाजूस सॉरी आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही. तसेच इंग्रजीमध्ये ‘एवरीथिंग इज लॉस्ट’ असे स्टेटस पाठवले होते.
स्टेटस पाहिल्यानंतर कांबळे यांनी आरोपीला फोन केला होता. फोन उचलत नसल्याचे पाहून कांबळे हे त्यांचा लहान भाऊ प्रतीक याला घेऊन आरोपीच्या घरी रात्री गेले. आतून बंद असलेला दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांनी दरवाजाची जाळी उचकटून घरात प्रवेश केला. तेव्हा आरोपी हरवाळकर हा त्यांच्या समोर आला. त्यावेळी हरवाळकर याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. तर त्याची पत्नी अर्चना हरवाळकर ही रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि मृत अवस्थेत आढळली. तर त्यांचा सहा वर्षाचा मुलगा घरातच बाजूला भेदरलेल्या अवस्थेत बसलेला आढळून आला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या घटनेची फिर्याद प्रणय यशवंत कांबळे (रा. आदित्य नगर ) यांनी विजापूर नाका पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपी विकास हरवाळकर याच्याविरुद्ध खून आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक शीतल कोल्हाळ यांनी या प्रकरणाच्या तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकार तर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यातील नेत्र साक्षीदार आरोपीचा लहान मुलगा आणि आरोपीची बहीण न्यायालयाच्या साक्षीत उलटले होते. मात्र सरकार पक्षाच्या उलट तपासणीत आरोपीने आपल्या पत्नीचा निघृणपणे खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. त्याप्रमाणे न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि त्याच्या लहान मुलास १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीच्या वतीने अॅड. पुजारी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस घाडगे यांनी सहकार्य केले.
● जीव वाचला पण न्यायालयाने सोडले नाही
हरवाळकर कुटुंब जुळे सोलापूर रेल्वे रुळाजवळील एका अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर रहात होते. विकास हरवाळकर यास झटपट पैसे कमवून श्रीमंत होण्याची अभिलाषा होता. यासाठी तो शिक्षकीपेशा सांभाळत पैशासाठी ना ना उद्योग करीत होता. बांधकाम व्यवसाय आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी लाखो रुपये गुंतवले, पण त्याला म्हणावा तसा परतावा मिळत नव्हता. त्यातच तो कर्जाच्या खाईत लोटला. पैशांसाठी त्यांच्याकडे अनेकांचा तगादा सुरु झाला. आणि त्यामुळे अखेर वैतागून त्यांनी प्रथम पत्नीला दगडी वरवंटा डोक्यात घालून मारले. त्यानंतर त्यांनी दारुच्या बाटली विष टाकून पिले. नंतर त्यांने पंख्याला दोरी बांधून स्वतः आत्महत्येची तयार सुरु केली होती. दरम्यान प्रणय कांबळे तेथे आले. त्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला आणि त्याचा जीव वाचला. पण न्यायालयाच्या कचाट्यातून तो सुटला नाही.