पंढरपूर : सूरज सरवदे
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेपासून कल्याणराव काळे यांचे वर्चस्व कारखान्यावर अबाधित राहिले आहे. गेली 23 वर्ष कल्याणराव काळे कारखान्याचे चेअरमन आहेत. मात्र पहिल्यांदाच कारखान्याची निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. परिवार, नातेवाईक आणि विरोधकांचे मोठे आव्हान कल्याणराव काळे यांच्यासमोर असणार आहे. Kalyanrao Kale is facing the challenge of opponents including his own in front of Kalyanrao Kale in the election of Sahakar Shiromani
कारखाना निवडणुकीपूर्वीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कल्याणराव काळे यांचे सावत्र बंधू समाधान काळे यांनी बंडाचे निशाण पेटवले होते. काळे गटात होणारी घुसमट समाधान काळे यांनी जाहीररित्या व्यक्त केली होती. युवकांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांनी गाव भेट दौरे देखील केले होते. मात्र अडचणीच्या काळात साथ सोडून जाणे आणि निवडणुकीनंतर अपेक्षित निकाल न लागल्यास त्याचे खापर आपल्यावर फुटू नये, या भावनेतून समाधान काळे यांनी आपले बंड थंड केले.
कल्याणराव काळे यांचा कारखाना म्हणजे त्यांचं स्वतःचं आणि नातेवाईकांचं साम्राज्य होतं. उसाला दर न देणे, कामगाराच्या पगारी न देणे, ऊस वाहतूक तोडणीदारांची देणे न देणे या अशा गोष्टीमुळे जवळचे नातेवाईक देखील दुखावले आणि दुरावले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दीपक पवार, नंदकुमार बागल, धनंजय काळे, बाबा काळे यासह अनेक नातेवाईकांनी कल्याणराव काळे यांच्यापासून फारकत घेत कल्याणराव काळे यांच्या विरोधात आता रान पेटवले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता काबीज केल्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्यावर सत्ता काबीज करण्यासाठी अभिजीत पाटील आणि डॉ. बी.पी रोंगे सर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील आणि चालू गळीत हंगामातील ऊस बिले देऊन अभिजीत पाटील यांनी सहकार शिरोमणीचे रणसिंग फुंकले आहे. अभिजीत पाटील गटाने मोठे शक्ती प्रदर्शन करत हजारो सभासदांना एकत्रित आणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
एकंदरीत पहिल्यांदाच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीने होत आहे. दीपक पवार, नंदकुमार बागल, धनंजय काळे अशा जवळच्या नातेवाईकांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात रान उठवले आहे. अभिजीत पाटील यांनी डॉ बीपी रोंगे सरांनी निवडणुकीत जोर झाल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.