सोलापूर : दुकानात काम करणाऱ्या महिलेला पाहून फ्लाईंग किस देत अश्लील इशारा केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित तरुणाने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सलीम अमीन जातकर (रा.प्रियंका चौक) यांच्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Solapur Jodbhavi Peth police molested a woman working in a shop with flying kisses
पीडित तरूणी ही एका दुकानात कामात असून तिला पाहून आरोपी जातकर तिच्या दुकानासमोर चक्करा मारत होता. शिवाय येता-जात पाहत जात होता. शनिवारी (ता. 20) दुपारच्या सुमारास आरोपीने पीडिता ज्या दुकानात काम करत होती. त्या दुकानाच्या समोर जाऊन हाक मारत त्यांना फ्लाईंग किस केले. शिवाय त्यांच्या पाहून मानेने इशारा करत पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीवर विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
○ चोरट्याने दुकानासमोरून दुचाकी पळवली
सोलापूर : व्ही पी आर दुकानासमोर पार्क करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच.१३.एई.७६७५ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना दि.१८ मे रोजी सकाळी ११ ते ६ वाजण्याच्या दरम्यान मार्केट यार्ड येतील व्ही पी दुकानासमोर घडली.
याप्रकरणी शरद अर्जुन ढावरे (वय-२९ , रा. हनुमान नगर न्यू बुधवार पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गंगावणे हे करीत आहेत.
● राहत्या घरासमोरून दुचाकी लंपास
सोलापूर : जुना विडी घरकुल येथील घरासमोर पार्क करून ठेवलेली दुचाकी क्र.एमएच.१३.बीटी.५७६४ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना दि.१३ ते १४ मे रोजी जुना विडी घरकुल येथे घडली.
याप्रकरणी श्रीनिवास राजू सकीनाल (वय-३०,रा.जुना विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अरकाल हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आई-वडिलांकडून ५० लाख हुंडा घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा
सोलापूर : सासरी विवाहिता नांदत असताना घरगुती किरकोळ कारणावरून तसेच आई-वडिलांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही असे म्हणत तुझ्या आई-वडिलांकडून ५० लाख रुपये हुंडा घेऊन ये या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत, छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना नोव्हेंबर २०१९ रोजी पासून ते ३ मे २०२३ पर्यंत क्रिस्टल अपार्टमेंट, समेल पाडा, नालासोपारा ठाणे येथे घडली. याप्रकरणी फौजीया इब्राहिम खान (वय-३७,रा. ददापुरे गॅलेक्सी,होटगी रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती इब्राहिम इस्माईल खान,नसीमा इस्माईल खान,नसरिन आरिफ शेख,फातिमा मेहताब मास्टर,आरिफ शेख (सर्व.रा. ओलीव्ह अपार्टमेंट, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मणुरे हे करीत आहेत.
● गाडी वळवताना अपघात; चालकावर गुन्हा
सोलापूर : फिर्यादी शाम भानुदास कुर्लेकर (वय-५६,रा.सुमित्रा पार्क) हे गाडी वळवत असताना समोरून येणाऱ्या एमएच.१३.डी.आर.३५५९ या क्रमांकाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अविचाराने चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांना व त्यांच्या नातवाला पायाला गंभीरित्या मुक्कामार लागून जखमी होण्यास कारणीभूत झाला आहे.
ही घटना १२ मे रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुमित्रा पार्कच्या गेट समोर घडली. अशा आशयाची फिर्याद शाम कुर्लेकर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून नागेश औदुंबर बामणे (वय-२२,रा.भाग्यलक्ष्मी पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करत आहेत.
● शतपावली करताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
सोलापूर : माजी सैनिक नगर जगदीश मंगल कार्यालय येथील जेवण करून राहत्या घराजवळील रस्त्यावर शतपावली करत असताना दूचाकीवर आलेल्या दोघा अनोळखी इसमानपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पळून गेल्याची घटना दि.२१ मे रोजी रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी बसव्वा गिरमल्ला कलमाडी (वय-६२,रा.वसंत नगर,विजापूर रोड) यांनी विजापूर नका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत.