सोलापूर : सीआयडीच्या चौकशीच्या कचाट्यात अडकलेले पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह तीन पोलिस निरीक्षक व ३०० पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले. Internal transfers of 300 policemen including police inspectors to Solapur
सोलापूर शहर पोलिस दलातील आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अंमलदाराच्या विविध शाखा व पोलिस ठाणे येथील रिक्त पदे व त्यांनी दिलेले पसंतीक्रम (विनंती बदली) विचारात घेऊन शिवाय कार्यकाल पूर्ण नसलेले; परंतु प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली असल्याचे सांगण्यात आले.
या बदली प्रक्रियेत अनेकांना एक वर्षाची मुदतवाढही देण्यात आली आहे. याशिवाय परिवीक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक अजय पोपटभट व राधा जेऊघाले यांना प्रशिक्षणासाठी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》मौजमजेसाठी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
सोलापूर : मौज मजेसाठी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रेम रामचंद्र राठोड (वय-२९, रा. प्रताप नगर तांडा, दक्षिण सोलापूर) व साईनाथ अनिल राऊत (वय-२८,रा.इंगळगी, दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मागील बारा दिवसांमध्ये विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करण्यात घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी तपास करताना पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली.
दरम्यान, आरोपी हे या चोरीतील सोने विकण्यासाठी दुचाकीवरून नंबर नसलेल्या मोटार सायकलीने रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रेम राठोड व साईनाथ राऊत यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान, त्यांच्याकडून दीड लाखाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील, त्यांच्या पथकातील इम्रान जमादार, विनोद रजपूत, संतोष मोरे, श्रीकांत पवार, विजयकुमार वाळके, राहुल तोगे, वाजीद पटेल, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, वसीम शेख, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केली.