सोलापूर : महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 110 वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या नूतनीकृत इंद्रभुवन इमारतीचे लोकार्पण गुरुवार, 25 मे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाइन कळ दाबून हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. Deputy Chief Minister Solapur Devendra Fadnavis inaugurated the renovated Indrabhuvan building on Thursday.
110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 5.13 कोटीच्या निधीतून नुतनीकरण करण्यात आले आहे. साधारणतः 11महिन्यात या इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने करण्यात आले आहे. सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनी मार्फत हे नूतनीकरणाचे काम करण्यात आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारागीर यासाठी परिश्रम घेतले आहेत.
या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन घडत आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठीची अंतर्गत फर्निचर व इतर कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे.
● दुसऱ्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय तर पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल
मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. सोलापुरातील इंद्रभुवन ही वास्तू हेरिटेज वास्तू आहे. 110 वर्षांपूर्वी आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात आली होती. नूतनीकरणामुळे या इमारतीला दिमाखदार असे गतवैभव प्राप्त झाले आहे. या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेले छायाचित्रही लावण्यात आले आहेत तसेच पहिल्या मजलावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय राहणार आहे.