सोलापूर / शंकर जाधव
राजकारणात आरोप-प्रत्यारोप करणे, हे काही नवे नाही. पूर्वी असे आरोप-प्रत्यारोप व्हायचे, पण ते विचारपूर्वक, सामंजस्य भूमिकेतून व्हायचे. आरोप करताना कुणाचे व्यक्तिगत चारित्र्यहनन व्हावे, कुणाचे मन दुखावेल, अशी वक्तव्ये केली जात नसत. Where has the ‘brain’ of the politicians gone, the tongue has been lifted, no one is satisfied with anything Politics Sanjay Raut Uddhav Thackeray त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कितीही राजकीय कुरघोडी झाल्या तरी हसत खेळत काम करीत. पण अलिकडील काही वर्षात हे सारेकाही रसातळाला गेले आहे. कुणीही पुढे यावे आणि कुणाही वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन आगपाखड करीत आरोप करावेत, याला काही मर्यादाच राहिली नाही.
आपल्याकडे लक्ष खिळवून ठेवण्यासाठी आणि आपली अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही राजकीय मंडळी बेलगामपणे तोंडाला येईल, ती खालच्या पातळीची भाषा वापरुन समाजात हलकल्लोळ माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा इतका संताप आला आहे की, या महाभागांना आपण निवडून दिलेच कशासाठी? असा प्रश्न पडला आहे.
शुक्रवारी राज्याच्या राजकारणात सर्वच पक्षातील महाभागांनी एकमेकांवर न पडणारे आरोप आणि वक्तव्य करुन आपले हसे करुन घेतले आहे. तसं गेल्या अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेत्यांची खालच्या हिन पातळीवरील वक्तव्ये नागरिकांच्या मेंदूला झिणझिण्या आणणारी ठरत आहेत. नागरिक यांना पाहून त्यांचे बोलणे ऐकून वैतागले आहेत.
तरीही या महाभागांना कुठल्याही प्रकारचा शहाणपणा येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शुक्रवारी केलेली बेताल आणि बेलगाम वक्तव्य हे कशाचे द्योतक आहे. यावर टाकलेला हा प्रकाश. या राजकीय पुढाऱ्यांचा बोटावर मोजण्याइतकी महाफैरी वाचून तुम्ही थक्क व्हाल. पण पुढे नजिकच्या काळात ही मंडळी कुणाला काय बोलतील आणि आपली डोक्यातील … गुडघ्यात आणतील…? देव जाणो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोंबड्यांचा खुराडा आणि नसबंदी शिंदे गट म्हणजे, भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी करताच शिंदे गटाचे आ. शहाजीबापू पाटील म्हणतात, बिनबुडाचं अडगं कुणीकडही बरळतंय…. हिदडतंय… ओरडतंय… रडतंय…… तर आ. संजय शिरसाट म्हणतात, संजय राऊत राजकारणातील प्रेम चोप्रा आहेत. तो असा चमत्कार आहे की, नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील, असे सांगतील. आता यावर नागरिकांनी काय बोध घ्यावा. सांगा… संजय राऊत, शहाजीबापू पाटील, संजय शिरसाट
● आंतरराष्ट्रीय नेते…
पक्षातून निलंबित झालेले काँग्रेस आ. आशिष देशमुख हे काटोला विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची चर्चा सुरु होताच. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणतात, आशिष देशमुख हे आंतरराष्ट्रीय न त आहेत. त्यांचा गांभियांने घेण्याची गरज नाही. आता सांगा… एकीकडे आंतरराष्ट्रीय नेते म्हणायचे आणि दुसरीकडे गांभियांने घेण्याची गरज नाही म्हणायचे, म्हणजे काय ?
कचरा खातात अन् नाल्यातून पैसा… राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड हे चांगलचे भडकले आहेत. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रोख धरुन नालेसफाई आणि कचरा हे ठाण्यातील सत्ताधाऱ्यांचं खाण्याचं कुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातून पैसाही. मला फसविण्याचे शंभर प्रकार झाले, पण मी गप्प बसणार नाही, असं म्हटलं आहे. आता सांगा आव्हाडांच्या या म्हणण्यात कशात कशा मेळ आहे का?..
○ चाटाचाटी…
संसद भवनाच्या उद्घाटनावरुन ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे म्हणतात, लोकशाहीत विरोधकांच्या भूमिकेला महत्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे काय ? आता या बोलण्यात थोडी सभ्यता आणता आली असती, ‘चाटाचाटी’ कशाला?, असे प्रश्न पडतोच ना..
○ पुन्हा एकदा पप्पूचं फॅड
‘पप्पू फेल हो गया…, राहुल गांधी हे पप्पू आहेत. हे जगजाहीर आहे. तरीही वारंवार मी पप्पू आहे, हे सिध्द करण्याची हुक्की त्यांना का येते, हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे’ असं भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ हे म्हणतात. आता हे पुन्हा एकदा पप्पूच फॅड चित्राताईच्या डोक्यात कुणी घुसवलं तेही कारण नसताना.
○ फोन… बटाटेवडे… गद्दार…!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, उध्दव ठाकरे हे पाच वर्षेत आमच्यासोबत सत्तेत होते. त्यांनी आमचा कधी फोनही उचलला नाही. आणि आता ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली, अशांना ते मातोश्रीवर बोलावून बटाटेवडे खाऊ घालीत आहेत. यावर बोलताना खा. संजय राऊत, लगेच म्हणतात, फडणवीसांवर गद्दारांची गाडी चालविण्याची वेळ आलीय. आता बोला, फोन… बटाटेवडे…. गद्दार…, गाडी…. यात कशाचे काही साटेलोटे आहे ?