● 289 झेडपी शिक्षक ठरले अपात्र, 6 जण होणार विस्तार अधिकारी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू झाली असून रविवारी सुट्टीच्या दिवशीही फाईल तपासणीचे काम सुरू होते. 170 Guruji’s fortune bore fruit; Headmaster to be promoted through disqualified Solapur Zilla Parishad Extension Officer त्यात १७० शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे. पूर्वीच्या समुपदेशनात प्राथमिक शिक्षण विभागाने २८९ झेडपी शिक्षकांना पदोन्नती लाभापासून अपात्र ठरवण्यात आले.
आज सोमवारी ८९३ शिक्षकांचे ऑनलाईनद्वारे समूपदेशन घेण्यात येणार आहे. या पैकी १७० शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणधिकारी संजय जावीर यांनी दिली. अंतिम सेवा ज्येष्ठता पदोन्नती ८९३ शिक्षकांची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. मागील वर्षी काही शिक्षकांनी पदोन्नती प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता. त्यांचा नकार आल्याने २८९ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ 3 वर्षे त्यांना घेता येणार नाही.
विस्तारधिकारी पदासाठी ६ जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे तर मुख्याध्यापक पदासाठी १७० जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाची जय्यत तयारी केली आहे. सांगोला फॅबटेक इंजनिअरींग कॉलेज, अकलकोट पंचायात समिती, पंढरपूर स्वेरी कॉलेज, माळशिरस पंचायत समिती, मंगळवेढा इंग्लिश स्कुल, माढा आदर्श पब्लिक स्कूल कुर्डुवाडी, करमाळा पंचायात समिती, मोहोळ पंचायत समिती, बार्शी सोनेक्स पोदार इंटरनॅशनल स्कूल, उत्तर अन दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिक्षकांच्या समुपदेशनासाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे.
गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत तालुकानिहाय ऑनलाईन मुख्यालय स्तरावर समूपदेशन घेण्यात येणार आहे. या समुपदेशनासाठी सीईओ दिलीप स्वामी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, प्रा.शि. अधिकारी संजय जावीर, समाजकल्याणधिकारी सुनील खमितकर यांची उपस्थिती राहणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती निवड समितीचे अध्यक्ष इशाधीन शेळकंदे, शिक्षक संघटनेचे
प्रतिनिधी अंकुश काळे यांच्या शिष्टमंडळासह शिक्षणधिकारीसंजय जावीर यांच्या बैठकीत पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.
शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी अंकुश काळे यांच्यासह शिष्टमंडळाने निवड समिती अध्यक्ष शेळकंदे यांची भेट घेतली. विस्तारधिकारी आणि मुख्याध्यापक पदोन्नतीला आमच कोणाची हरकत नाही. बहुतांश शिक्षक हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची पदोन्नती करा, अशी मागण लावून धरण्यात आली.
या मागणीवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. सेवाज्येष्ठत यादीवरून प्रशासनाकडून समस्य मांडण्यात आल्या. सरतेशेवटी पात्र शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात याद्या प्रकाशीत करून २८ आणि २९ मे रोजी समूपदेशन घेण्याच नियोजन करण्यात आले आहे.
● सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू
शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी शनिवार आणि रविवारी प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालय सुरू असणार आहे. सेवा जेष्ठता यादी संकलन करण्यात येणार आहे. २९ मे रोजी समुपदेशन घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.