सोलापूर : सोलापूर शहरातील पूना नाका ते हैद्राबाद नाका रोड वरील धोत्रीकर वस्ती येथे भुयारी मार्ग नसल्यामुळे अपघात होऊन एका व्यक्तीचा बळी गेला. आत्तापर्यंत जवळपास सहा बळी गेले आहेत. Thiya agitation in the office of District Magistrate; Chetan Narote, Prof. Ashok Nimbergi, Suresh Patil together in Solapur सततच्या अपघातामुळे संतप्त होऊन मंगळवारी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भुयार मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, संजय कणके, प्रा. अशोक निंबर्गी एकत्र आले होते. नागरिकांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी हायवेवरून जावे लागते भरधाव जाणाऱ्या मोठ्या वाहनामुळे या भागात सतत अपघात होत आहेत, नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
या सततच्या अपघातामुळे संतप्त होऊन सुरेश पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, संजय कणके यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. तेथून सात रस्ता येथील नवीन नियोजन भवन येथे जाऊन ताबडतोब भुयार मार्ग करण्यात यावे या मागणीचे निवेदन निवासी अप्पर जिल्हाधिकारी पवार यांना देण्यात आले. पवार यांनी संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सावंत बंधूंचे लक्ष्य शहर मध्य; प्रा. शिवाजी सावंत यांच्यासाठी चाचपणी सुरू
सोलापूर : लोकसभेबरोबरच इच्छुकांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सोलापूर शहरातील शहर मध्य मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून आता प्रा. शिवाजी सावंत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सावंत जर शहर मध्य मधून निवडणूक रिंगणात उतरले तर शहर मध्य ची लढाई हायव्होल्टेज होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवण्यात येत आहे.
शहर मतदार संघाचे गेल्या तीन टर्म पासून आ. प्रणिती शिंदे नेतृत्व करत आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. 2009 मध्ये या मतदारसंघातून पुरुषोत्तम बरडे, 2014 मध्ये महेश कोठे तर 2019 मध्ये दिलीप माने यांनी शिवसेनेनेकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. सध्या चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शहर मध्य हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवण्याच्या तयारीत आहे.
काही महिन्यांपूर्वी शहर मध्य मतदार संघातून शिवसेनेकडून मनीष काळजे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता प्राध्यापक शिवाजी सावंत हे निवडणूक लढवणार असल्याचे चर्चेले जात आहेत. याबाबत शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरमध्यची जागा प्राध्यापक सावंत यांच्यासाठी द्यावी, अशी मागणी केली आहे.
प्राध्यापक शिवाजी सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. सावंत बंधू प्रत्येक निवडणुकीत नियोजनपूर्वक उतरतात हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सावंत बंधू खास करून तानाजी सावंत हे राजकारणातील कुबेर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दरियादिलीचे अनेक नमुने संपूर्ण राज्याने पाहिले आहेत. त्यामुळे प्राध्यापक सावंत जर शहर मध्यमधून या निवडणुकीत उतरले तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर त्यांची जोरदार टशन पाहायला मिळणार आहॆ.