कोल्हापूर : कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. Tension in Kolhapur, internet service shutdown, curfew order enforced, offensive post vandalized त्यामुळे लवकरच येथील इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलायं. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचंही चित्र पाहायला मिळालं.
जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे.
कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह पोस्टवरून हिंदुत्ववाद्यांनी बंदची हाक पुकारली आहे. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी चौकात गर्दीत आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप होत आहे. यामुळो पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. आक्षेपार्ह पोस्टविरोधात आंदोलकांनी बंदची हाक दिली होती. यानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज मोठा मोर्चाही काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दरम्यान आज मोर्चा काढणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक दिली आहे. आज कोल्हापुरात या संघटनेचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहेत. समाज माध्यमावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर काल कोल्हापुरात गोंधळ झाला होता. त्यानंतर आज या संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. यावेळी मटण मार्केट परिसरात आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम गृहविभागाचे आहे, असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ‘शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
कोल्हापुरातील परिस्थितीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत असे ते म्हणाले. कायदा हातात घेऊ नका, शांततेने प्रश्न सोडवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून द्वेष निर्माण केला जातोय का? याचा तपास करावा. पोलिसांना फ्री हँड द्यायला हवे आहे. कोल्हापुरातील घटनेमागे कोण याचा सरकारने छडा लावावा, असे पवार म्हणाले.