सोलापूर : महाराष्ट्राची विचारधारा पुरोगामी विचाराची असताना सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे भविष्य, पंचांग, वास्तूदोष यामध्ये गुरफटल्याचे दिसत आहे. ‘Mahsul Bhawan’ surrounded by Vastu Dosh, fear of direction scares government Babu Vastu Dosha Ritual Solapur त्याची प्रचिती सोलापुरात नव्याने बांधण्यात आलेल्या महसूल भवन अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळातून आली. कार्यालयांमध्ये कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. त्यामुळे महसूल भवनामध्ये वास्तूदोषाची चर्चा रंगली आहे. या चर्चेने नवे जिल्हाधिकारी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडणार की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच अखेर लोकार्पण सोहळा दिमाखात पा पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालये या नूतन कार्यालयात स्थलांतरित होत आहेत. बुधवा प्रशासन प्रमुख दस्तुरखुद जिल्हाधिकारी कार्यालयातील दफ्तर एक मोठ्या ट्रकमधून आणले गेले आहे. जिल्हा प्रशासनाचा कारभार नूतन महसूल भवनातूनच चालू आहे. मात्र उद्घाटन झाल्यापासून हे महसूल भवन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उद्घाटन झाल्यानंतर या महसूल भवनातील दोन महागडे पेंटींग चोरीला गेल्याने खळबळ माजली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकारी,
अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल) तसेच सामान्य शाखा, (आवक व जावक टपाल), लेखा शाखा, गृह शाखा, जिल्हा खनिकर्म शाखा, ग्रामपंचायत शाखा, पाणी टंचाई शाखा, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, राष्ट्रीय जिल्हा विज्ञान केंद्र, जिल्हा माहिती तंत्रज्ञान शाखा, जिल्हा पुनर्वसन शाखा, कूळ कायदा शाखा, नगर पालिका प्रशासन, आस्थापना शाखा, विधी अधिकारी, महसूल शाखा, नैसर्गिक आपत्ती शाखा, राजशिष्टाचार शाखा विभागाचा कारभार चालू आहे. मात्र, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे यावरून कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील काही विभागातील दालनाचे तोंड पश्चिमेकडे आहे. त्यामुळे त्या दालनातील कर्मचाऱ्यांच्या बसण्याची आसन व्यवस्था त्याप्रमाणे केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना उत्तर दिशेकडे बसून काम करण्याची इच्छा आहे. कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आसन व्यवस्था कर्मचाऱ्यांच्या मर्जी प्रमाणे करण्याची लगबग सामान्य प्रशासन विभागात बुधवारी दिसून आली. तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उत्तर दिशेकडे बसण्याची सोय करण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येते.
● वास्तुदोष की कर्मकांड
कोट्यावधी रूपये खर्च करून निर्माण केलेल्या देखण्या वास्तूमध्ये दोष तर नाही ना? असा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जुन्या कर्मकांडमध्ये गुरफटले तर नाहीत ना? याबाबतची चर्चा नूतन महसूल भवनामध्ये जोरदार चालू आहे.
● महसूल भवानात तोकड्या सोयी
महसूल भवनात सर्व विभागांचे कामकाज चालू झाले असले तरी अद्याप सोयी सुविधांचा अभाव आहे. कार्यालयाच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळते. स्वच्छतागृहात सुद्धा अस्वच्छता आहे. पाण्याची सुविधा नाही. लाईट गेल्यास बसवण्यात आलेली सोलर सिस्टीम कार्यान्वित झाली नाही. त्याचा फटका प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी बसला. अचानक लाईट गेल्याने सर्व खिडक्या उघड्या ठेवून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली.