● भाजप म्हणतीय अजित पवारांवर अन्याय झाला’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 25 वर्ष झाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. शरद पवार हे दिल्लीत बोलत होते. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार असे ते म्हणाले. Election of Supriya Sule as Executive President, left the program without speaking Ajit Pawar Nationalist Injustice Anniversary BJP Praful Patel
सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणा व पंजाबमधील पक्षाचा कारभार सुळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांनाही कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले असून त्यांना गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड व गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. आज शरद पवार यांनी दिल्लीत घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. यावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी यावर काहीही बोलणे टाळले. तसेच नवीन जबाबदाऱ्यांची घोषणा होताच अजित पवार कार्यक्रमातून निघून गेले. त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आहे.
राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन आज मुंबईत साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते येथे उपस्थित आहेत. दरम्यान, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्ली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजित पवार नाराज असलेल्या चर्चांना त्यांनी फेटाळले. अजित पवार नाराज नाहीत. त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. तसेच लोकांच्या मागणीमुळे सुप्रिया सुळेंकडे पद दिले, असेही ते म्हणाले. 23 जूनला पाटणामध्ये विरोधकांची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. यावर अजित पवारांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी निवड करण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले असून शरद पवारांनी टाकलेला विश्वास हे नेते सार्थ ठरवतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘हृदयात महाराष्ट्र, नजरे समोर राष्ट्र’ हा विचार ठेऊन पक्ष देश आणि राज्यासाठी मोलाचे योगदान देईल, असे ते म्हणाले.
अजित पवारांवर कोणताही अन्याय झाला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राची जबाबदारी सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर पवार राज्यातील विरोधीपक्ष नेते आहेत, ही मोठी जबाबदारी आहे, असे पाटील यांनी म्हटले.
Gratitude! कृतज्ञ 🙏🏼⏰ pic.twitter.com/pkjbtAPypv
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची आज निवड करण्यात आली आहे. याबद्दल सुळे यांनी पक्षसंघटनेचे आभार मानले आहेत. ‘पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे,’ असे सुळे यांनी म्हटले.
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली. यानंतर अजित पवार कार्यक्रम संपताच निघून गेले. यानंतर विद्या चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला. ‘शरद पवारांनी दिलेला राजीनामा मागे घेतला नाही किंवा ऐकलेच नाहीतर काय करायचे? यावर, तेव्हा अजित पवारांनीच सुप्रियांना कार्यकारी अध्यक्ष बनवावे, असा प्रस्ताव दिला होता,’ असा खुलासा विद्या चव्हाण यांनी केला.
शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. यावर अजित पवारांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी निवड करण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले असून शरद पवारांनी टाकलेला विश्वास हे नेते सार्थ ठरवतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘हृदयात महाराष्ट्र, नजरे समोर राष्ट्र’ हा विचार ठेऊन पक्ष देश आणि राज्यासाठी मोलाचे योगदान देईल, असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीने आज सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली नाही, उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे आदित्य यांच्याशिवाय काही चालत नाही, त्याप्रमाणे शरद पवारांना सुप्रिया यांच्याशिवाय काही चालत नाही, असेच दिसत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच मागे वाय. बी. चव्हाण सेंटरला जे घडलं ते तमाशाचं वगनाट्य होतं, अशीही टीका बावनकुळे यांनी यावेळी केली. जसं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंशिवाय दुसरं कुणी चालत नाही, तसं शरद पवार यांना मुलगी सुप्रिया सुळे यांच्याशिवाय कुणी चालत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“मी अजित दादा यांच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. कारण अजित दादा हे खऱ्या अर्थाने त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी ते ठरवायचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची निवड महाराष्ट्राकरता बरी झाली असती. मला अजित पवार यांच्या नाराजीबद्दल काही माहिती नाही. मला त्यांच्या नाराजीबद्दल काही सांगायचं नाही. पण मला एवढं माहिती आहे की, अजित दादा कार्यक्षम आहेत. छगन भुजबळ कार्यक्षम आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.