मुंबई : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने केक कापून सेलिब्रेशन केले. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही. ‘Shivaraj Ashtak’: Digpal Lanjekar’s film ‘Shivarayancha Chaava’ will soon be released on Shambhuraj. तसेच शिवरायांची आणि शंभुराजेंची भूमिका कोण साकारणार हे समोर आले नाही. ‘शिवराज अष्टक’ मधून शिवछत्रपती आणि मावळ्यांचा पराक्रम सांगणारे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ चित्रपट याआधी रिलीज झाले आहेत.
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, सनी रजानी आणि वैभव भोर निर्मित “शिवरायांचा छावा” या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या साहसाची आणि शौर्याची गाथा मांडण्यात आली आहे. हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शिवरायांचा छावा’ चित्रपटात शंभूराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, परंतु यामध्ये काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करीत “लवकरात लवकर प्रदर्शानाची तारीख आम्हाला कळवा” अशी मागणी केली आहे.
हा आगामी चित्रपट हा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे द्वितीय राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आहे. दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर सेटवरील नुकतीच पोस्ट शेअर करत शूटींग पूर्ण झाल्याची महिती दिली आहे.
रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
आले मराठे आले मराठे
आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे)
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पाच्छाई झोडती असे मराठे
सुभेदार
गड आला पण ….
🚩🚩🚩#सुभेदार#DigpalLanjekar pic.twitter.com/kAMF8VPOOZ— Digpal Lanjekar (@DigpalOfficial) March 11, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक बोलताना निर्माते सनी रजानी सांगतात की, “माझ्या पहिल्याच चित्रपटाचे ‘शिवरायांचा छावा’ चे चित्रीकरण सलग 33 दिवसांच्या विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दिग्पाल सरांसोबत काम करणे हा आमच्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव होता. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारा अभ्यासू दृष्टिकोन हा त्यांच्या सेटवरील प्रत्येक कामातून दिसून येत होता.
मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले आहे. आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केले आहे त्यांच्यापैकी दिग्पाल सर एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या विषयावर इतके संशोधन केले आहे. त्यांची इतिहासाबद्दल आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, मल्हार पिक्चर्स कंपनीची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट सादर करताना मला खूप अभिमान वाटतो. मला खात्री आहे की हा चित्रपट रसिक प्रेक्षक देखील आनंदाने स्वीकारतील आणि ही मोहीम यशस्वी करतील.”
” माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल”,
– दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक