○ जाहिरातीविषयी बोलताच हसले आणि हात जोडून निघून गेले
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व वर्तमानपत्रांना राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची जाहिरात दिली. या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय व्यक्ती म्हणून शिंदेंना पसंती असल्याचे म्हटले आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ते माध्यमांकडे पाहून हसले व हात जोडून निघून गेले. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सगळ्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातीची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या जाहीरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंती देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती’ देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे.
आज माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी जास्त पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी पहिल्यांदा माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. यावेळी, जनतेने आमच्या डबल इंजिन सरकारला पंसती दिली आहे. मला व फडणवीसांना जनतेची पंसती मिळाली. जाहिरातीत कोणाचे फोटो आहेत नाहीत त्याला काही महत्त्व नाही. आम्ही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीवर टीका केली आहे. मागील 30 वर्षांत पहिल्यांदाच अशी जाहिरात पाहिली आहे. त्यांनी अशी जाहिरात देऊन स्वतःचे हसं करुन घेतले आहे. हे सर्व्हेक्षण कोणी केली ही माहिती नाही. या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटोच नाहीत, असे ते म्हणाले. फडणवीसांपेक्षा शिंदे हे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहेत का? असे ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला ४६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गटाला ३५ टक्के मते मिळू शकतात, तर मनसेला ३ टक्के आणि इतरांना १६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
जनमत चाचण्यांनुसार भाजप आघाडीला 165 ते 185 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच ओपिनियन पोलमध्ये भाजप युती आरामात 145 च्या बहुमताचा आकडा मिळवताना दिसत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आघाडी अर्थात महाविकास आघाडीला ८८ ते १०८ जागा मिळू शकतात. जनमत सर्वेक्षणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन ते पाच आणि इतरांना १२ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
विविध पक्षांबाबत बोलायचे झाले तर भाजपला 121 ते 131 जागा मिळू शकतात तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटाला 44 ते 54 जागा मिळू शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 39 ते 49 तर राष्ट्रवादीला 41 ते 51 जागा मिळू शकतात. मनसेला दोन ते पाच जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर इतरांना 12 ते 22 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रातील ४८ टक्के लोक एनडीए अर्थात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिसले. तर 32 टक्के लोकांनी एमव्हीए म्हणजेच शिवसेना उद्धव गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला चांगले म्हटले आहे. पण 17 टक्के लोक होते ज्यांनी दोन्ही आघाडीच्या सरकारांचे वर्णन सारखेच केले. तर तीन टक्के लोकांनी यावर कोणतेही मत मांडले नाही.