» हिन दर्जाचे राजकारण थांबवण्याचे आवाहन
》वेळ आल्यावर राजकारणात उतरण्याचे संकेत
सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आल्याने पुढील दोन वर्षे ऊस गळित हंगाम चालू शकणार नाही. चिमणी नसेल तर कोणत्या नव्या तंत्रज्ञानाने कारखाना सुरू करता येईल, याची चाचपणी करणार आहे. Dharmaraj Kadadi blasted ‘chimney’ on BJP, if time permits, Solapur will enter politics काहीही झाले तरी शेतकरी, कामगार आणि सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कारखान्याची चिमणी पाडण्यास भाजपच जबाबदार असून स्थानिक पातळीवर हिन दर्जाचे, निषेधार्ह राजकारण झाल्याचा आरोप काडादी यांनी यावेळी केला. गुरुवारी कारखान्याची चिमणी प्रशासनाकडून पाडल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन काडादी यांनी आपली बाजू मांडली. काडादी म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून कारखाना आदर्श पध्दतीने सुरू आहे. राज्यात शेतकऱ्यांना चांगला दर देणारा कारखाना, असे या कारखान्याचे नाव आहे.
मात्र व्यक्तिगत राग, द्वेष जोपासण्याच्या मानसिकतेतून चिमणी पाडण्याची कृती झाली आहे. डीजीसीएचा प्रारंभिक सर्व्हे चुकला होता. त्यामुळे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याबाबतची मागणी आणि विचार होता. मुंबई उच्च न्यायालयातही याबाबत २० जून रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र प्रशासनाने कशाचीच वाट न पाहता चिमणीचे पाडकाम केले. ज्यांनी हे करायला लावले त्यांच्या मानसिकतेची किव करावीशी वाटते. चिमणी पाडकामास भाजपच जबाबदार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
धर्मराज काडादी यांच्या वार्तालापासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
एक वेळ मंत्री आणि चारवेळा आमदार असणाऱ्यांनी शहरात कोणता उद्योग आणला हे सांगावे, असा प्रश्नही काडादी यांनी आ. विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केला. लोकप्रतिनिधींनी शहरामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र सुरु असलेले उद्योग बंद पाडणे अयोग्य आहे.
उद्योग बंद पाडून विकास करणे खेदजनक आहे. फक्त वीज निर्मिती बंद पडेल आणि साखर कारखाना सुरू राहील असे म्हणणे चुकीचे आहे, असेही काडादी यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
असताना याबाबत आम्ही त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी चिमणी स्थलांतरित करण्याबाबत सांगितले होते. आम्ही त्यांना योग्य जागा दाखवविण्याबाबत सुचवले. अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली परंतु त्यांनी सुचवलेल्या जागेवर चिमणी स्थलांतरित करणे अशक्य होते, असे काडादी यांनी सांगितले.
बोरामणी विमानतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कारखान्याला लक्ष्य करण्यासाठी होटगी रस्त्यावरील विमानतळाकडे लक्ष देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेस श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी, शरण काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक विद्याधर आलुरे, केदार मेंगाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे, राजू हौशेट्टी, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
● धर्मराज काडादी म्हणतात…
→ विमानसेवेच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो
> लोकांच्या चुलीत पाणी घालून होणारा विकास मान्य नाही भाजपाच्या लोकप्रतिनिधींची भूमिका अयोग्य
> आगामी काळात कारखान्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल हे माहिती नाही. मात्र कामगारांची उपासमार करणार नाही
> उद्योग, माणसे सांभाळली पाहिजेत. त्यांचे मनोधैर्य खचू देणार नाही.
○ अन्यथा होईल दीड हजार कोटींचे नुकसान
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पूर्वस्थितीत आला नाही तर कारखान्याचे एक हजार ते दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा दावा यावेळी धर्मराज काडादी यांनी केला.
● ३० मीटर चिमणीची विनंतीही धुडकवली
आम्ही २०१७ मध्ये चिमणीची उंची ३० मीटर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला होता त्याला अद्याप उत्तर दिलेले नाही. चिमणी पाडकामावेळीही ३० मीटर ठेवून उर्वरित चिमणी पाडा, अशीही विनंती करण्यात आली होती. त्यालाही उत्तर न देता चिमणी पाडण्यात आल्याचे काडादी म्हणाले.
● संजय थोबडे यांनाही लगावला टोला
काहीजण चिमणी पडली तरी कारखाना सुरू होण्यास अडचण नसल्याचे सांगत आहेत. त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते, असे म्हणत काडादी यांनी ज्यांना काही तांत्रिक बाबी माहिती नाहीत, असेही आजकाल बोलत असल्याचे सांगत माजी तज्ज्ञ संचालक संजय थोबडे यांना टोला लगावला.