● सदाभाऊ खोत यांची उद्विग्न मागणी
● दुध दर प्रश्नी सरकारने बोलविली २२ जुलैला बैठक; उत्पादन खर्च ३५ रूपयांवर
सोलापूर : देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत तरी एक लिटर दुधाला द्या असे उद्विग्न होत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. Give a liter of milk as much as a quart of country liquor; The demand of the Ryat Kranti Sangathan Sadabhau Khot
दुधाला भावच नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत प्रचंड नाराज झाले आहेत. विदेशी दारूच्या एका बाटलीची जेवढी किंमत आहे, तेवढे पैसे आम्हाला नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढी किंमत एक लिटर दुधाला द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला आहे.ते इंदापूर येथील मेळाव्यासाठी आले असता दै.सुराज्य शी बोलत होते.
उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्यांना दुध विकावे लागत आहे. पशुखाद्य, चाऱ्याचे वाढलेले दर यामुळे दुधधंदा परवडत नसतानाही शेतकरी तो व्यवसाय करीत आहे. परंतु सहकारी व खाजगी दूध संघाच्या मनमानी कारभारला सरकारकडून लगाम घालणे गरजेचे असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका बजावत असल्याने शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी पसरली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सदाभाऊ खोत यांनी ही उद्विग्न मागणी करत राज्य सरकारला इशाराही दिला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांनी दुध दरासंदर्भात गुरुवारी (दि.२२ जुलै) राज्यातील प्रमुख खाजगी व सहकारी दुध उत्पादक संघ व पशुखाद्य उत्पादक संस्थासोबत चर्चा करण्यासाठी विधान भवन पुणे येथे बैठक बोलविली आहे. या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांचे दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
● महागाई वाढत नाही
गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणं अवघड नाही. त्यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
● तर हातात नांगर आहे
जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असा इशाराच खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
कारखान्यांसमोर आंदोलन करणार
गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागं करू. कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे असलेल्या साखर कारखानदारांने ते पैसे दिले नाहीत. पैसे देणे गरजेचे आहे. पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांकडे अनेक समस्या आहेत. जर 30 जूनपर्यंत पैसे दिले नाहीत तर 1 जुलै रोजी साखर कारखांन्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असंही ते म्हणाले.
○ उत्पादन खर्च असा होतो
गाय खरेदी, पशुखाद्य, चारा,विमा,क्रत्रीम रेतन,वैद्यकीय खर्च,मजूरी असा एकूण होणारा खर्च ,त्याला वर्षाचे ३६५ दिवस भागून १ लिटर दुधाला ३६ रूपये ५८ पैसे खर्च येतो.तर शेण विक्रीतून १ रूपया वजा करून ३५ रूपये ५८ पैसे एक लिटर दुध उत्पादनासाठी खर्च येतो असा ठोकताळा शेतकऱ्यांनी काढला आहे. तर सध्या ३.५/८.५ साठी ३१ रूपये प्रतिलिटर प्रणाणे दुध खरेदी केली जात आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास दुधधंदा बंद पडण्याची भिती व्यक्ती केली जात आहे. तर २३ रोजी होणारी बैठक ही फार्स न ठरता ठोस निर्णय घेतला जावा अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे.