सोलापूर / दीपक शेळके
अनेक वर्षापासून राजकारणाचा विषय ठरलेली सिध्देश्वर कारखान्याची चिमणी शांत झाली. मात्र या चिमणीची धग कायम राहणार आहे. Whose ‘Deshmukhi’ will be in trouble due to the ‘chimney’ of Siddheshwar factory Solapur Dharmaraj Kadadi चिमणी पाडकामाचे राजकीय आणि समाजिक परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर लोकसभासह शहर उत्तर विधानसभा, दक्षिण विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदार संघावर चिमणी पाडकामचे पडसाद उमटून येथल राजकीय ‘देशमुखी’ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिमणी पाडल्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक तसेच कामगार कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. चिमणी पाडण्यामागे भाजप असल्याचा आरोप कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी केला आहे. त्यांचा रोख भाजपाचे खासदार, आमदारांवर आहे. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पहिल्यापासून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे काडादी यांना भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी, माकपा, शिवसेना यांची सहनुभुती मिळत आहे.
सर्व राजकीय पक्ष काडादींना सहानुभूतीचे पाठबळ देऊन भाजपला टार्गेट करत सोलापुरातील दोन्ही देशमुखांना अडचणीत आणण्याची व्युव्हरचना आतापासून आखली जात आहे. त्यामध्ये महाविकास अघाडीतील घटक पक्ष आघाडीवर आहेत. कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे विरोधकांना पाठबळ मिळाले आहे.
वास्तविक पाहता कारखान्याचे कार्यक्षेत्र दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच अक्कलकोट भागात आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासद आहेत. या लोकांचे कारखान्याशी एक भावनिक नाते जोडले गेले आहे. चिमणी पाडल्यानंतर यांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या माध्यमातून हा रोष बाहेर येण्याची शक्यता आहे. यांचे थेट परिणाम सोलापूर लोकसभासह शहर उत्तर आणि दक्षिण संघावर पडणार असल्याचा दावा सोलापूर आणि काही प्रमाणात अक्कलकोट विधानसभा मतदार संघावर पडणार असल्याचा दावा जाणकार करत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यासाठी धर्मराज काडादी यांना मैदानात उतरावे लागणार आहे. काडादी शहरातील मोठे घराणे आहे. या घराण्याला मान आहे. अनेक शिक्षण संस्था सामाजिक संस्था सहकारी चळवळीच्या माध्यमातूनही घराणे अग्रेसर आहे. मात्र आता गलिच्छ राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप होत आहै. धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडण्यामागे असलेल्या झारीतील शुक्राचार्यांना केंव्हाच उघड केले आहे. हे कटकारस्थान करणाऱ्यांच्या विरोधात थेट मैदानात उतरण्याची भाषा काडादी यांनी केली आहे. मात्र शहर उत्तर किंवा दक्षिण विधानसभा पैकी कोणत्या मतदारसंघावर स्वार होणार ? की चिमणी पाडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्याची आणि सभासदांची फौज उभी करणार ? हे उघड केले नाही.
धर्मराज काडादीचा नेमका रोष कोणावर आहे. हे उघड झाले आहे. मात्र आपली नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे निवडणुकांना असणारा कालावधी लक्षात घेता या विषयाची तीव्रता किती कायम राहते ? हे देखील पहावे लागणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चिमणीच्या पाडकामाचा ठराव आणण्यासाठी कोणत्या पक्षाच्या आमदारांनी मदत केली. तो ठराव मंजूर व्हावा म्हणून भाजपाच्या सर्वच नगरसेवकांना व्हीप कोणाच्या सांगण्यावरून बजावला. या उत्तराचा शोध घेतला असता एकाच लोकप्रतिनिधीचे एकाच पक्षाचे नाव पुढे येते. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांची व्याप्ती पाहता त्यामुळे शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे दोन टार्गेट असल्याने या दोन्ही मतदारसंघातील ‘देशमुखी’ अडचणीत आली आहे.