अकलूज / सोलापूर : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच आज सकाळी – सोलापूर जिल्हा हद्दीत आगमन झालं. तत्पूर्वी निरास्नानाचा सोहळा पार पडला. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निरा नदीच्या पात्रात पाणी नव्हतं. त्यामुळे टँकरच्या पाण्याने संत तुकारामाच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालावं लागलं. यामुळे वारकऱ्याच्या नीरा स्नान सोहळा अनुभविण्याच्या आनंदावर विरझण पडले. Bathing the feet of Saint Tukaram in the river Neera with tanker water, Saint Shrestha Dnyaneshwar Mauli’s goal arena in Akluj Sadashivnagar Pandharpur
आज सकाळी सराटी गांवाजवळ नीरा नदीत हा स्नान सोहळा पार पडल्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश केला. सीमेवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखी सोहळ्याच जोरदार स्वागत केले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालखीचा आजचा मुक्काम अकलूज येथे असणार असून तत्पूर्वी सदाशिव नगर येथे अश्वांचे गोलरिंगण सोहळा पार पडला.
नातेपुते मुक्कामी सायंकाळी पावसाने सोहळ्यावर गुलाब पाण्याप्रमाणे हलकासा शिडकाव केला . या शिडकाव्याने वारकऱ्यांना पावसाची चाहूल लागली . आता पाऊस बरसणार या आनंदातच ते काल झोपी गेले. नातेपुते परिसरातील नागरीकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
पहाटे घंटानाद झाला आणि माऊलींची माळशिरसकडे निघण्याची तयारी सुरु झाली . पहाटेची विधीवत पूजा व आरती प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ६ वाजता सोहळा मार्गस्थ झाला. आज सकाळच्या विसाव्यालाच दुपारचे भोजन व विश्रांती असल्याने स्वयंपाकाची वाहने पहाटेच मांडवे ओढा येथे पोहोचली होती . गेली १५ दिवस उन्हाच्या झळया सहन केलेल्या वारकऱ्यांना आजची ढगाळ वातावरणातील वाटचाल सुखकर वाटत होती.
सकाळी ९ वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला . सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना , कर्मवीर बाबासाहेब माने पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांनी येथे अन्नदान करण्यात आले . भोजनानंतर सोहळा सकाळी ११ वाजता पुरंदावडेकडे मार्गस्थ झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● वाहतुकीचे चुकीचे नियोजन
मांडवे ओढा ते पुरंदावडे या सुमारे पाच किलोमीटर अंतरात उड्डाणपूल असल्याने तसेच पुरंदावडे येथे सोहळ्यातील पहिले गोल रिंगण असल्याने हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती . त्यातच दुपारचे भोजन घेवून वारकऱ्यांची वाहने माळशिरसकडे मार्गस्थ झाली होती . पोलिसांनी उजव्या हाताला असलेली पालखी व रिंगण सोहळा लक्षात घेता उजव्या हातानेच सोहळा पुरंदावडेकडे नेणे गरजेचे असताना सोहळा डावीकडून व वाहने उजवीकडून काढल्याने वाहनांची गर्दी वाढली. त्यामुळे मांडवे ओढा येथून सकाळी साडेदहा वाजता निघालेली वाहने सायंकाळी उशीरापर्यंत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू शकली नाहीत . त्यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले. त्यातच पाऊस झाल्याने शेतात वाहने घालताना , तंबु ठोकताना अडचण निर्माण झाली .
सोहळा श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत सदाशिवनगर येथे पोहोचला. त्यावेळी सरपंच विरकुमार दोशी , उपसरपंच उदय धाईंजे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा
पुरंदावडे हद्दीत पोहोचला . येथे सरपंच राणी बापू मोहिते , उपसरपंच देवीदास ढोपे, ग्रामसेवक दिक्षीत , चेअरमन बाळासाहेब सुळे पाटील, हरी राऊत , सुनील ढगे , पोपट गरगडे , संतोष शिंदे व ग्रामस्थांनी स्वागत केले .
आखीव रेखीव रिंगण सोहळ्यात अश्वासह माऊली आल्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली . प्रथम श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार , सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी रिंगणाची पाहणी केली. माऊलींची पालखी रिंगणाच्या मध्यभागी पोहोचताच माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी माऊलींच्या पादुकांची पूजा करुन दर्शन घेतले.
त्यानंतर कॉंग्रेसचे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील व मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली . गेली १५ दिवस हुलकावणी देणाऱ्या पर्जन्यराजाने रिंगण सोहळ्यात हजेरी लावीत माऊलीसह वैष्णवांवर जलाभिषेक केला. पावसाच्या सरी अंगावर झेलीत मोती या माऊलींच्या व हीरा या स्वाराच्या अश्वाने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या . पर्जन्यराजाचे आगमन व अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला.
या उत्साहातच उडीचा कार्यक्रम अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडला . येळीव येथील अल्पशा विश्रांतीनंतर सोहळा पडत्या पावसातच माळशिरस मुक्कामी पोहोचला .येथे नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख व नगरवासीयांनी सोहळ्याचे स्वागत केले .