सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेतील सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आज रविवार सायंकाळच्या सुमारास पंढरपुरात दाखल झाले. तत्पूर्वी सोलापुरात दाखल होऊन नंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. Chief Minister Shinde Ashadhi suddenly entered Pandharpur before the Yatra and took stock
आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले.
साेलापुरात त्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला. आषाढी एकादशीचा साेहळा २९ जून राेजी हाेणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्याचे पंढरपुरात आगमन हाेते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा प्रथमच चार दिवस आधी पंढपुरात येत आहेत.
नियाेजित दाैऱ्यानुसार रविवारी नांदेड येथे रविवारी त्यांचा कार्यक्रम हाेता. हा कार्यक्रम संपवून मुख्यमंत्र्यांचे विमान साेलापुरात दाखल झाले. साेलापूर पाेलिसांना या दाैऱ्याची माहिती रविवारी दुपारी दाेन वाजता मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानतळ ते पंढरपूर या मार्गावर पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दर्शन रांग, वाखरी रिंगण साेहळ्याच्या स्थळावर पाहणी करणार आहेत. राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पंढरपुरात महाआराेग्य शिबीर हाेणार आहे. या शिबिराच्या तयारीची पाहणी करणार असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितले होते.
परंडा येथे पाच लाख नागरिकांची तपासणी करून विश्वविक्रम केलेल्या सावंत बंधूंनी त्याहीपेक्षा भव्य चारपट मोठे अर्थात २० लाख नागरिकांच्या तपासणीसाठी महाआरोग्य शिबिर पालखी मार्गावर तीन ठिकाणी आयोजित केले आहे. या रेकॉर्डब्रेक शिबिरासाठी ५ हजार डॉक्टरांचा ताफा असणार आहे. भक्तीच्या पालखी सोहळ्यात होणारा आरोग्याचा मेळा यंदा आकर्षण ठरणार आहे. यासही मुख्यमंत्री भेट देतील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शासकीय वाहनाने ते पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. पंढरपुरात पोहल्यानंतर ते पालखी तळ, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर यासह आदी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीतील तयारी, आढावा व विविध उपाययोजना संदर्भात माहिती घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या.
आषाढी एकादशी २९ जून २०२३ रोजी होणार आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून २८ जून २०२३ रोजी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हे सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी हजर राहतील असेही सांगण्यात आले. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.