● रिंगण सोहळ्यावर विमानातून होणारी पुष्पृवृष्टीची परवानगी प्रशासनाने नाकारली
सोलापूर : आषाढी वारीचे औचित्य साधून भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या अख्या मंत्रिमंडळासह 600 गाड्यांचा ताफा घेऊन हैदराबादहून सायंकाळी सोलापूरला पोहोचले. Big show of strength: KCR enters Solapur, Farmers meeting in Pandharpur tomorrow K Chandrasekhar Rao Sarkoli
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सोलापुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज दाखल झाले आहेत. जवळपास 110 आमदार आणि खासदारांसह 600 गाड्यांचा फौजफाटा घेऊन केसीआर सोलापुरात आले आहेत. यावेळी के चंद्रशेखर राव यांना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती
उद्या, (मंगळवारी) विठुरायाचे दर्शन घेणार असून पंढरपूर येथे शेतकरी मेळावा घेत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वाखरी येथे होणाऱ्या पालखी सोहळ्यावर विमानातून पुष्पुष्टी करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून सोलापूर विमानतळावर केसीआर यांचे विमान येऊन थांबले आहे. परंतु प्रशासनाने विमानातून पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आणि बीआरएस पक्षात प्रवेश करणारे भगीरथ भालके यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाखरी येथील वारीच्या प्रसिद्ध रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. माजी खासदार धर्मन्ना सादूल यांनी हेलिकॉप्टरद्वारे रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्याचे पत्र जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी काढले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरवर्षी ५ लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक वाखरी रिंगण सोहळ्यात उपस्थित राहतात. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत के चंद्रशेखर राव यांना हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही असे म्हटले.
के. चंद्रशेखर राव हे सोमवारी दुपारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि खासदारांसह हैद्राबादच्या प्रगती भवनातून सोलापूरला निघाले. वाटेत त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. सायंकाळी के चंद्रशेखर राव आणि त्यांचा ताफा सोलापुरात पोहोचला. या सर्वांसाठी सोलापुरात मुक्कामासाठी विविध हॉटेल्समध्ये 225 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातील मुक्कामानंतर मंगळवारी चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरला रवाना होणार आहेत.
विठ्ठल मंदिरात पूजा आणि दर्शन केल्यानंतर केसीआर हे पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या सरकोली या गावात जाणार आहेत. या ठिकाणी भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश झाल्यानंतर चंद्रशेखर राव शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंढरपूर येथून निघाल्यानंतर केसीआर हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेणार आहेत.